लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतर्गत वर्धा रोडवरील निर्माणाधीन छत्रपती मेट्रो स्टेशनच्या साईटवर १० ते १५ किलो वजनी आणि ८-९ फूट लांब लोखंडी रॉड अचानक खाली पडला. हा रॉड रस्त्याने जात असलेल्या एका चारचाकी वाहनावर पडल्याने कारचे नुकसान झाले. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यात वाहनचालक व रस्त्याने ये-जा करणारे थोडक्यात बचावले.विशेष म्हणजे हा अपघात मेट्रोमधील मजूर किंवा कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला नाही तर साईटवरून लोखंड चोरणाऱ्या टोळीतील एक सदस्य रंगेहात सापडल्याने त्याने तो रॉड खाली फेकला होता. यामुळे मेट्रोच्या कामावरून लोखंडाची सुनियोजितपणे चोरी होत असल्याची बाबही उघडकीस आली आहे. याबाबत संबंधित कंत्राटदाराने पोलिसात तक्रार केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार पांढरकवडा येथील अशफाक पोसवाल गुरुवारी सकाळी आपल्या खासगी चारचाकी वाहनाने (एमएस-२९, बीसी-०१६५) ने नागपूरला येत होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास ते वर्धा रोडवरील छत्रपती मेट्रो स्टेशनच्या साईवरून जात असताना त्यांच्या गाडीवर बनलेल्या कॅरिअरवर अचानक भारी वस्तू पडली. अशफाक यांनी लोकमतला सांगितले की, गाडी थांबवून पाहिले असता एक रॉडी गाडीचे कॅरिअर व दरवाजाला छेदून खाली पडला होता. ते पाहून दुचाकी वाहन चालकही थांबले. त्यांनी निष्काळजीपणासाठी परिसरात तैनात मेट्रो कर्मचारी आणि मजुरांना सुनावले. परंतु त्यांनी कार्यालयात संपर्क साधण्यास सांगितले. कार्यालयात गेल्यावर त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. तेथून एक नंबर मिळाला. त्यावर संपर्क साधला असता काही इंजिनियर आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले.लोखंड चोर टोळीचे कृत्यवर्धा रोडवरील मेट्रोच्या अनेक स्टेशनचे काम सुरु आहे. येथील एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जयप्रकाशनगर, छत्रपती चौक, राहाटे कॉलनी या मेट्रो स्टेशनच्या साईटवर काही महिला व पुरुष लोखंड व इतर साहित्याची चोरी करीत असल्याचे प्रकार सुरु आहेत. गुरुवारी सुद्धा ही टोळी साईटवरून लोखंड चोरी करीत होती. ही बाब लक्षात येताच गार्ड व सुपरवायजरने एका सदस्यास पकडले. त्यामुळे घाबरून त्याने चोरलेले लोखंडी रॉड खाली फेकले. यात वाहन चालक व पादचारी थोडक्यात बचावले. मेट्रोच्या कंत्राटदाराने सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मेट्रो साईटवरून पडले लोखंडी रॉड : वाहनचालक, पादचारी थोडक्यात बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:23 AM
मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतर्गत वर्धा रोडवरील निर्माणाधीन छत्रपती मेट्रो स्टेशनच्या साईटवर १० ते १५ किलो वजनी आणि ८-९ फूट लांब लोखंडी रॉड अचानक खाली पडला. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. यात वाहनचालक व रस्त्याने ये-जा करणारे थोडक्यात बचावले.
ठळक मुद्देनागपूरच्या वर्धा रोडवरील घटना