निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

By कमलेश वानखेडे | Published: November 29, 2024 04:09 PM2024-11-29T16:09:40+5:302024-11-29T16:12:53+5:30

नाना पटोले यांचा सवाल : ईव्हीएमवर एवढे प्रेम का ?

Is the Election Commission doing booth capturing? | निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का?

Is the Election Commission doing booth capturing?

कमलेश वानखेडे, नागपूर 
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
मतदानाच्या शेवटच्या तासात झारखंडमध्ये मते वाढली, पण ते प्रमाण फक्त दीड टक्का होते. मात्र, महाराष्ट्रमध्ये ७.६ टक्के मतदान वाढले. हे मतदान रात्री कसे वाढले, एवढी मोठी लाईन कुठे लागली, त्या लाईनचे फोटो निवडणूक आयोगाने द्यावे, अशी मागणी करीत निवडणूक आयोग बूथ कॅपचरिंग करत आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

शुक्रवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले, आपण निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले त्यावर उत्तर देण्याचा आयोगाने अयशस्वी प्रयत्न केला. सायंकाळी ६ नंतर ६२.२ टक्के मतदान झाल्यावर रात्री ६६.५ टक्के मतदान झाल्याचे सांगतात. ९ लाख मते कशी वाढली याचे उत्तर आयोगाने द्यावे. सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोग पारदर्शक कारभार असल्याचे सांगतात, मग ईव्हीएमचे एवढे प्रेम का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या विरोधात राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबविली जाईल. लाखो लोकांच्या स्वाक्षरीसह मुख्य निवडणूक आयोगाला पत्र दिले जाईल. आम्ही न्यायालयीन लढाई लढू, निवडणूक आयोगाला प्रश्न विचारू, जण भावनेची लढाई लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकार
मतदान वाढले त्याचा फायदा कोणाला होतो याची चर्चा होते, पण निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. आम्ही मतदान वाढवले असे आयोग ट्विट करते, पण हे मतदान कसे वाढले, याचे स्पष्टीकरण देत नाही. हे लोकांचा मतांनी नव्हे तर निवडणूक आयोगाच्या कृपेने आलेले सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

पाच दिवस होऊनही सरकार अस्तित्वात नाही
मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णय भाजप नेचे घेतील. पण निकाल लागून पाच दिवस झाले तरी सरकार अस्तित्वात आले नाही, हे चिंताजनक आहे. एकनाथ शिंदे नाराज आहेत की आणखी कुणी याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

Web Title: Is the Election Commission doing booth capturing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.