‘भीम’ शब्द धार्मिक आहे का? निवडणूक आयोगाला मागितले स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2023 09:55 PM2023-01-25T21:55:52+5:302023-01-25T21:56:21+5:30

Nagpur News ‘भीम’ शब्द धार्मिक व जातीवाचक आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी भारतीय निवडणूक आयोगाला केली व यावर १ फेब्रुवारीपर्यंत भूमिका मांडण्यास सांगितले.

Is the word 'Bhima' religious? Clarification sought from Election Commission | ‘भीम’ शब्द धार्मिक आहे का? निवडणूक आयोगाला मागितले स्पष्टीकरण

‘भीम’ शब्द धार्मिक आहे का? निवडणूक आयोगाला मागितले स्पष्टीकरण

Next

नागपूर : ‘भीम’ शब्द धार्मिक व जातीवाचक आहे का? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी भारतीय निवडणूक आयोगाला केली व यावर १ फेब्रुवारीपर्यंत भूमिका मांडण्यास सांगितले.

भारतीय निवडणूक आयोगाने ‘भीम’ शब्द धार्मिक व जातीवाचक असल्याचे कारण देऊन भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता नाकारली आहे. त्याविरुद्ध भीम सेनेचे अध्यक्ष श्रीधर साळवे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने भीम नाव असलेल्या अनेक पक्षांना मान्यता दिली असल्याची व भीम सेना पक्षाचीही नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण मागितले.

भारतीय निवडणूक आयोगाने राज्यघटनेतील आर्टिकल ३२४ व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम २९-ए अंतर्गत निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार धार्मिक व जातीवाचक नाव असलेल्या पक्षाला मान्यता दिली जाऊ शकत नाही. भीम सेना या पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी २० जून २०१६ रोजी सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्यात आला होता. आयोगाने संबंधित वादग्रस्त कारणावरून १६ मार्च २०१८ रोजी तो अर्ज नामंजूर केला. हा निर्णय अवैध असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. भीम हे धार्मिक किंवा जातीय नाव नाही. भीम नावाची जात वा धर्म देशात अस्तित्वात नाही. भीम हे नाव डॉ. भीमराव आंबेडकर या नावाचा भाग आहे. त्यामुळे आयोगाचा निर्णय रद्द करून भीम सेना पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता प्रदान करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

Web Title: Is the word 'Bhima' religious? Clarification sought from Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.