शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

हा शालेय शिक्षण आराखडा की धार्मिक शिक्षण?

By निशांत वानखेडे | Published: June 01, 2024 6:51 PM

मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे टीका : अनिष्ट कला, वादग्रस्त श्लोक गाळण्याची मागणी

नागपूर : राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने सादर केलेल्या राज्य शैक्षणिक व शालेय शिक्षण आराखडा २०२४ ला समाजाच्या सर्वच स्तरातून विराेध हाेत आहे. या आराखड्यावरून साहित्यिक व मराठी अभ्यासकांनी राज्य सरकारला धारेवर धरले आहे. मनुस्मृतीचे वादग्रस्त श्लाेक व इतर गाेष्टींचा समावेश केल्याने हा शाेलय शिक्षण आराखडा आहे की धार्मिक शिक्षण, अशी राेखठाेक टीका मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयाेजक श्रीपाद भालचंद्र जाेशी यांनी केली आहे.

श्रीपाद जाेशी यांनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि शाेलय शिक्षण मंत्र्यांना पत्र लिहून आराखड्यातून वादग्रस्त श्लाेक आणि अनिष्ट कलांचे शिक्षण काढून टाकण्याची मागणी केली आहे. भारत हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक आणि सर्वसमावेश देश आहे. अशा देशात एका विशिष्ट धर्माच्या शिक्षणाचा समावेश करणे, याेग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यापेक्षा सर्व धर्मांची नैतिक मूल्यांचा अंतर्भाव त्यात करावा व मनुस्मृतीचे वादग्रस्त श्लाेक हटविण्यात यावे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. त्यामुळे सर्वसमावेशक, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक भारतीयतेचा आणि राज्यघटनेतील तत्त्वांचा संस्कार शैक्षणिक आराखड्यात करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. भारतीय ज्ञान वारसा शिकविताना महाराष्ट्रातील संतांसोबतच भक्ती कालखंडातील कबीर, रहीम, चैतन्य महाप्रभू, मीरा यासारख्या संतांचा समृद्ध वारसाही नेमला जावा. याशिवाय बौद्ध, जैन, शीख, ख्रिस्त आणि इस्लाम धर्मातील नैतिक मूल्यांचे संस्कार, विनोबांची समश्लोकी मराठी ‘गीताई’, राष्ट्रसंतांची 'ग्रामगीता यात अंतर्भूत करावी, अशी सुचना त्यांनी दिली.

मुलांना या कला शिकविणार का?या आराखड्यामध्ये कलाशिक्षण प्रकरणात ललितकलांची यादी मुनी वास्यायन यांच्या कामाशास्त्रावरून घेतली आहे. छलीक योग (चलाखी करून हातोहात फसवणे), द्युतक्रीडा (जुगार खेळणे), इंद्रजाल (गारूडविद्या व जादूटोणा यांचे ज्ञान असणे) अशा कलांचा त्यात अंतर्भाव आहे. या कालबाह्य कलांना वगळून आधुनिक काळाशी सुसंगत अशी ललित कलांची यादी समाविष्ट करावी.

राज्याच्या शालेय शिक्षणाच्या आराखड्याला झालेला विरोध लक्षात घेता मुळात केवळ तिसरी ते पाचवी असा तीनच वर्ष अनिवार्य असलेला मराठी विषय पहिली ते दहावी अनिवार्य करणारा दुरूस्त आराखडा पत्रक परिषदेने काढले असले तरी अद्यापही बारावी पर्यंत मराठी अनिवार्य करण्याची दुरूस्ती टाळून, मराठी भाषा धोरणाची जी पायमल्ली या आराखड्यात झाली आहे ती दूर करावी.- श्रीपाद भालचंद्र जाेशी, संयाेजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी

लैंगिक शिक्षणा अंतर्भाव करावा- माेबाईलमुळे लहान मुलांना वाईट पद्धतीने विकृत स्वरुपात लैंगिक ज्ञान हाती येत आहे. त्यामुळे स्त्री पुरुष समानता, नकाराचा अधिकार, गुड टच / बॅड टच आणि निकोप भिन्नलिंगी मैत्री सांगणारे लैंगिक शिक्षण मिळावे.- भारतीय संविधान ही भारतीय लोकशाही, कायद्याचे राज्य आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीचे तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळे संविधान शिक्षणाचा अंतर्भाव असावा.- वैज्ञानिक दृष्टीकाेण विकसित हाेईल, असे शिक्षण.- शाळेत कलांगण व क्रिडांगण असावे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षणnagpurनागपूर