शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
3
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
4
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
5
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
6
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
7
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
8
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
9
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
10
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
11
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
12
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
13
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
14
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
15
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
16
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
17
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
18
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
19
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण

ईश्वर कुंगवानी जेरबंद

By admin | Published: May 13, 2017 2:50 AM

व्यापाऱ्यांची कोट्यवधींची भिसी चालवून अनेकांना लाखोंचा फटका देणाऱ्या ईश्वर कुंगवानी नामक आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

भिसीचा गोलमाल : अनेकांची रक्कम हडपली लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : व्यापाऱ्यांची कोट्यवधींची भिसी चालवून अनेकांना लाखोंचा फटका देणाऱ्या ईश्वर कुंगवानी नामक आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. तो सध्या कोठडीत असून, अन्य दोन आरोपी फरार आहे. आरोपी कुंगवानी आणि त्याचे नातेवाईक शहरातील विविध भागात मोठमोठ्या व्यापाऱ्यांची कोट्यवधींची भिसी चालवतात. प्रत्येक महिन्याला भिसीत सहभागी होऊन लाखो रुपये जमा करणाऱ्या व्यापाऱ्यांची ही भिसी कमिशन तसेच बोली तत्त्वावर चालवली जाते. एकूण रक्कमेपैकी जो सदस्य सर्वात जास्त रक्कम सोडण्यास तयार असेल त्याला भिसी मिळते. एकदम मोठी रक्कम एकत्रपणे हातात पडत असल्यामुळे अनेक जण जास्तीत जास्त रक्कम सोडायला तयार असतात. त्यानंतर भिसीची परतफेड दर महिन्याला ठराविक रकमेचा हप्ता भरून केली जाते. हा भाग सदस्यांच्या नफा नुकसानीचा आहे. दुसरीकडे भिसी चालविणाऱ्याला दर महिन्याला लाखोंचे कमिशन मिळते. कुंगवानी त्याचमुळे विविध भागात व्यापाऱ्यांसाठी भिसी चालवित होता. त्याने या भिसीत रक्कम जमा करणाऱ्या अनेक व्यापाऱ्यांकडून लाखो रुपये जमा केले आणि त्यांना भिसी न देता त्यांची फसवणूक केली. या संबंधाने ६५ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा पाचपावली ठाण्यात १२ एप्रिलला दाखल झाला होता. तेव्हापासून ईश्वर कुंगवानी, पूजा आणि मोहित कुंगवानी हे पोलिसांना गुंगारा देत होते. दुसरीकडे पीडित व्यापारी त्यांचा शोध घेत होते. बुधवारी रात्री ईश्वर कुंगवानी काही व्यापाऱ्यांच्या हाती लागला. त्याला त्यांनी पाचपावली ठाण्यात नेऊन दिले. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाकडे (ईओडब्ल्यू) असल्यामुळे पाचपावली पोलिसांनी त्याला गुन्हे शाखेच्या हवाली केले. पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगार यांनी ईश्वर कुंगवानीला अटक करून कोर्टात हजर केले. फसवणुकीची लाखोंची रोकड त्याने लपवून ठेवल्यामुळे तसेच त्याच्या फरार साथीदारांचा शोध घ्यायचा असल्याचे सांगून पोलिसांनी कोर्टातून त्याची १६ मे पर्यंत कोठडी मिळवली. भिसीतून कोट्यवधींची माया आरोपी कुंगवानी आणि त्याच्या नातेवाईकांनी भिसीच्या माध्यमातून अनेकांना गंडा घालत कोट्यवधींची माया जमविल्याची चर्चा आहे. त्याने अनेक आलिशान वाहनेही खरेदी केली. त्यातील एक वाहन गेल्या आठवड्यात कुंगवानीने विकले आणि तो विदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता, अशी माहिती पीडित व्यापाऱ्यांना कळाली. त्यामुळे त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.