लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु वैद्यकीय रुग्णालयांची आहे. पशु संवर्धनाचे काम करणारी ही रुग्णालये आता डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील ४० पशु रुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान मिळाला आहे.शेतकऱ्यांना दुग्ध व चारा उत्पादनाची जोड मिळाल्यास ते समृद्धतेची कास धरू शकतात हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा स्थानिक पशु रुग्णालयांच्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन मिळेल. आपली भूमिका ही मार्गदर्शकाची असावी, हा हेतू पशु रुग्णालयांचा आहे. पुढील काळात ही रुग्णालये शेतकऱ्यां
नागपूर जिल्ह्यातील ४० पशुरुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 10:05 PM
देशातील विविध क्षेत्रातील जीडीपीचा विचार केल्यास, इतर क्षेत्राच्या तुलनेत पशु आणि दुग्ध व्यवसायाचा जीडीपी वाढलेला दिसतो आहे. त्यामुळे पशु संवर्धनाला सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. पशु आणि दुग्ध व्यवसायात वाढलेल्या जीडीपीत महत्त्वाची भूमिका पशु वैद्यकीय रुग्णालयांची आहे. पशु संवर्धनाचे काम करणारी ही रुग्णालये आता डिजिटलायझेशनकडे वाटचाल करीत आहे. याचाच एक भाग म्हणून नागपूर जिल्ह्यातील ४० पशु रुग्णालयांना ‘आयएसओ’चा मान मिळाला आहे.
ठळक मुद्देलोकसहभागातून डिजिटलायझेशनकडे वाटचाल : पशुपैदास व दुग्धउत्पादनात होणार वाढ