लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज सर्वत्र पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत असून महामेट्रोनेदेखील या दिशेने आणखी एक उच्चांक स्थापन केला आहे. पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोच्च समजले जाणारे आयएसओ १४०००१:२०१५ प्रमाणपत्र नागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र डिझाईन, निर्माण कार्य तसेच मेट्रो संचालनादरम्यान पर्यावरण व्यवस्थापनाच्या धोरणाच्या अंमलबजावणीकरिता केलेल्या उपाययोजनांमुळे प्राप्त झाले आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी पर्यावरणपूरक पद्धतीने केली जात असून हे प्रमाणपत्र एक उदाहरण आहे.महामेट्रोचे निर्माण कार्य पर्यावरणाचा समतोल राखून शहराच्या प्रगतीला चालना देते. आयएसओ ही आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था असून ठरविण्यात आलेल्या मानांकनाचे समन्वयन आणि एकत्रिकरण केल्या जाते. १४००१ हे एक पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली (ईएमएस) आहे. संस्थेच्या पर्यावरणीय प्रभावाचे मूल्यांकन करून त्यामध्ये सुधारणा करीत असते. महामेट्रोने निर्माण केलेली पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा ही नागरिकांना उत्कृष्ट सेवा देण्याकरिता कटिबद्ध आहे. त्यामध्ये मल्टीमॉडेल इंटिग्रेशन, सौर ऊर्जा आणि प्रवाशांना आरामदेय सुविधांचा समावेश आहे.पर्यावरण संवर्धनाकरिता केलेल्या उपाययोजना, वृक्षारोपण, मेट्रो स्थानकाला मिळालेले आयजीबीसी प्रमाणपत्र, सांडपाण्याचा पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ऊर्जेच्या बचतीकरिता उचललेली पाऊले, सौर ऊर्जेचा उपयुक्त वापर, प्रकल्पामध्ये सुरक्षेसंबंधी केलेल्या उपाययोजना, आपात्कालीन परिस्थितीकरिता केलेल्या उपाययोजना, कर्मचाऱ्यांमध्ये पर्यावरणसंबंधी निर्माण केलेली जागरूकता आदी निकषांच्या आधारे नागपूर मेट्रो प्रकल्पाला प्रमाणपत्र मिळाले आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला आयएसओ प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:51 PM
आज सर्वत्र पर्यावरण दिवस साजरा करण्यात येत असून महामेट्रोनेदेखील या दिशेने आणखी एक उच्चांक स्थापन केला आहे. पर्यावरण व्यवस्थापनाच्या क्षेत्रात सर्वोच्च समजले जाणारे आयएसओ १४०००१:२०१५ प्रमाणपत्र नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाला प्राप्त झाले आहे.
ठळक मुद्देविविध निकषांची पूर्तता : प्रकल्पात पर्यावरणपुरक पद्धतीची अंमलबजावणी