शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
3
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
4
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
5
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
6
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
7
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
8
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
9
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
10
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
11
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
12
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
14
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
15
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
16
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
17
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
18
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
19
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
20
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)

या 'बस'मध्ये बसा अन् अंतराळ फिरून या...! 'अंतरिक्ष बस' विदर्भाच्या प्रवासावर; 'इस्त्रो'चे मंगळ मिशन 

By निशांत वानखेडे | Published: August 14, 2023 6:21 PM

आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते.

नागपूर: आपल्यापेक्षा लक्षावधी किलोमीटर दूर असूनही इथून दिसणारे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह आणि एकूणच अंतराळाचे विद्यार्थ्यांना कायम कुतूहल असते. या अंतराळाची सफर घडविण्याची मोहीम भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो)  एका बसच्या माध्यमातून सुरू केली आहे. ही ‘अंतरिक्ष बस’ सध्या विदर्भाच्या प्रवासावर असून मंगळवारी स्वातंत्र्य दिनी ती नागपूरहून रवाना होणार आहे.

नागरिकांना व विशेषत: विद्यार्थ्यांमध्ये अंतराळातील घडामोडींचे कुतूहल दूर करून त्यांच्या खगोल विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी इस्रोने ही मोहीम सुरू केली आहे. विज्ञान भारतीसोबत गेल्यावर्षी झालेल्या सामंजस्य करारानुसार इस्रोच्या आउटरिच कार्यक्रमाची जबाबदारी विज्ञान भारतीने घेतली आहे व त्या सहकार्याने ही अंतरिक्ष बस देशभर फिरविली जात आहे. विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळाचे सचिव नरेश चाफेकर यांनी माहिती दिली. इस्त्रोच्या इतिहासात आतापर्यंत राबविल्या गेलेल्या ‘मिशन मंगळ’, चंद्रयान-२ मोहीम व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती चित्रफितीतून होईल. रॉकेट कसे उडते, रॉकेटवर सॅटेलाईट कसे असेंबल केले जाते व अंतराळात सोडले जाते, त्यांचे सर्व मॉडेल्स व अभ्यासपूर्ण टेक्नीकल माहिती विद्यार्थ्यांना मिळेल.

१५ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर, हैदराबादचे संचालक जी. श्रीनिवास राव यांच्या उपस्थितीत या अंतरिक्ष बसचे उद्घाटन होईल आणि ती विदर्भाच्या प्रवासावर रवाना होईल. सुरुवातीला वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील शाळेत ती पाेहचेल. प्रत्येक जिल्ह्यात किमान १५ दिवस ती फिरणार आहे. आसपासच्या शाळांनी या अंतरिक्ष बसचा लाभ घ्यावा, असे आवाहन चाफेकर यांनी केले. अंतराळ दर्शनासह विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, पोस्टर मेकिंग, वादविवाद स्पर्धा, इलोकेशन, रांगोळी स्पर्धा अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरisroइस्रो