शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

काश्मीरच्या मुद्यावर भूतकाळात चूकच झाली

By admin | Published: October 26, 2015 2:52 AM

काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत.

सुमित्रा महाजन : आता कणखर भूमिका घेण्याची गरजनागपूर : काश्मीरच्या मुद्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजही तणावाचे संबंध आहेत. सुरुवातीच्या काळातच या मुद्यावर भारताने मोठी चूक केली व त्याचे परिणाम आजदेखील भोगावे लागत आहेत. काश्मीरचे हे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार आहे असा प्रश्न उपस्थित करत लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. १९६५ च्या युद्धातील माजी सैनिकांच्या सत्कार समारंभादरम्यान त्या बोलत होत्या. लोकसभाध्यक्षांनी अशाप्रकारे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे व आ. मितेश भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. भारताने कधीही पाकिस्तानवर युद्ध लादले नाही. परंतु पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. १९६५ च्या युद्धात पाकिस्तानचे काय हाल झाले हे सर्व जगाने पाहिले. परंतु जर काश्मीरच्या मुद्यावर वेळीच तोडगा काढण्यात आला असता तर आज त्याचे दुष्परिणाम भोगावे लागले नसते. आज त्या जखमेचा नासूर झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आम्ही वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तर आपला शेजारी अजूनही काश्मीरचा राग आळवतोय. आता मात्र या मुद्यावर कणखर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. हे भिजत पडलेले घोंगडे वाळविण्यासाठी नेत्यांना प्रवृत्त करण्याची वेळ आली आहे आणि आताचे नेते जर असे करत असतील तर जनतेने त्यांना समर्थन करावे, असे त्या म्हणाल्या. देशाला योग्य नेतृत्व असले की त्याचे समर्थन करण्याची आवश्यकता असते. लालबहादूर शास्त्री यांच्यामागे पूर्ण देश उभा होता. त्यामुळे योग्य निर्णय घेणाऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे रहावे असे प्रतिपादन केले. (प्रतिनिधी)काश्मीरमुळे होते सैनिकांचे स्मरणकेवळ युद्धकाळात सैनिकांची आठवण होते व इतर वेळी ते विस्मृतीत जातात असे बोलले जाते. पण, भारतात हे चित्र जरासे वेगळे असून बर्फाखाली धगधगणाऱ्या काश्मीरमुळे आपण सातत्याने सैनिकांचे स्मरण करतो. देशातील सैनिक सीमेवर एकटा लढत असला तरी त्याच्या पाठीमागे संपूर्ण देश असतो. नवीन पिढीमध्ये राष्ट्रभक्तीचे संस्कार पेरले पाहिजेत, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.