शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

उपराजधानीतील कोविड हॉस्पिटल्समध्ये एक बेड मिळणेही कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 10:48 AM

शहरातील १६ खासगी रुग्णालयांमधील १८७६ बेड्स कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. परंतु, रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे हे बेड्स कमी पडत आहेत.

ठळक मुद्दे तीव्र गतीने वाढतेय संक्रमण आणि मृत्यूचे आकडेवेंटिलेटर्सचाही मोठा तुटवडा 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य भारताचे मेडिकल हब म्हणून ओळखले जाणारे नागपूर वर्तमानात जेवढे दिसतेय तेवढे हतबल कधीच दिसले नव्हते. कोरोना संक्रमणाने रोज सरासरी ४० हून जास्त लोक मृत्यूमुखी पडत आहेत. कोरोनाचे रुग्ण बेडसाठी हॉस्पिटल्सच्या चकरा मारत आहेत. वेंटिलेटर्सचाही प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. मोठमोठे दावे करणाऱ्या स्थानिक शासन आणि प्रशासनाची क्षमता तोकडी पडल्याचे दिसून येत आहे. राज्य सरकारच्या कार्यक्षमतेचा तर पत्ताच नाही.

सद्य:स्थिती दयनीय झाली आहे. ही स्थिती दर्शवणाऱ्या कथा सर्वत्र दिसून येत आहेत. रुग्ण जर गरीब किंवा मध्यमवर्गीय असेल तर त्यांच्यावर संकटाचा डोंगरच कोसळल्यासारखी स्थिती आहे. सर्वच गंभीर रुग्ण मेडिकल आणि मेयोमध्येच येत असल्याने तेथे बेड मिळणे कठीण झाले आहे. बेड्सचा तुटवडा निर्माण होणार नाही, असे मोठमोठाले दावे करणारी महानगरपालिका तोंडघशी पडली आहे. खाजगी हॉस्पिटल्समध्ये बेड्स उपलब्ध आहेत. मात्र, तेथील वास्तविकता वेगळीच आहे. कोणत्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये फोन केल्यास, तेथून बेड रिकामे नसल्याचेच उत्तर मिळत आहे. रुग्ण जर गंभीर अवस्थेत असेल तरी बेड मिळण्याचा प्रश्नच नाही. काही अपवाद वगळता सर्वच खाजगी हॉस्पिटल्सची स्थिती हिच आहे. जे पैसा खर्च करण्याची क्षमता ठेवतात, त्यांनाही बेड मिळायला जागा नाही. त्यामुळे, मेडिकल आणि मेयो हेच गंभीर रुग्णांसाठी एकमात्र स्थळ उरले आहे.या दोन्ही हॉस्पिटल्सवरील ताण प्रचंड वाढला आहे. मेयोच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६०० बेड्स आहेत. त्यातील २०० बेड्स आयसीयूसाठीचे आहेत. मात्र, सर्वात मोठी समस्या डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफच्या कमी असलेल्या संख्येची आहे. नियमानुसार कमीत कमी २८८ डॉक्टर्स असणे गरजेचे आहे. जेणेकरून २४ तास प्रत्येक रुग्णाला उत्तम उपचार मिळेल. परंतु, येथे केवळ ७० डॉक्टर्सच उपलब्ध आहेत. हे डॉक्टर्स नक्कीच परिश्रम घेत आहेत. मात्र, एवढ्या कमी संख्येमुळे स्थिती आणखीणच बिकट झाली आहे. मेयो प्रशासनाने १२६ डॉक्टरांची मागणी केली होती. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पॅरामेडिकल स्टाफची संख्याही फारच तोकडी आहे. मेडिकलची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. येथेही किमान २८८ डॉक्टर्सची गरज आहे. परंतु, ४० टक्के डॉक्टर्सचा तुटवडा आहेच. चिकित्सा कर्मचारी आणि वेंटिलेटरच्या कमतरतेमुळे संक्रमितांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकदा तर वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचेही दिसून येते.या कारणामुळे रुग्णांच्या मृत्यूची संख्या सतत वाढत आहे. आॅगस्टमध्ये ९१९ रुग्णांच्या मृत्यूनंतरही प्रशासनाने गांभीर्याने हालचाली केल्या नाही. त्यावरून शहराला निराधार सोडल्याचे दिसून येते. यावेळी प्रत्येक नागरिकाला प्रशासन एवढे हतबल का आहे, हा एकच प्रश्न भेडसावत आहे. खासगी रुग्णालयांत खाटा नाहीतशहरातील १६ खासगी रुग्णालयांमधील १८७६ बेड्स कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. परंतु, रुग्णांची संख्या सतत वाढत असल्यामुळे हे बेड्स कमी पडत आहेत. सध्या रोज ५ ते ६ हजार कोरोना चाचण्या होत आहेत व त्यातून सुमारे १४०० चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार घ्यायचे असतात, पण बेड उपलब्ध होत नाही. बेड मिळालेच तर, भरमसाठ शुल्क मागितले जात आहे. मनपाने दर निश्चित केले आहेत, पण त्याचे पालन होत आहे का याचे उत्तर कोण देईल.

होम आयसोलेशनमधील रुग्ण वाऱ्यावरमहापालिकेची परिस्थिती दयनीय आहे. त्यांच्याकडे डॉक्टर व परिचारिका कमी आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना घरी ठेवले जात आहे. अशा रुग्णांसोबत ८ ते १० दिवसानंतर संपर्क केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, अशा रुग्णांना तत्काळ उपचाराची गरज असते. परंतु, अनेक प्रकरणात रुग्ण बरा झाल्यानंतर मनपाची चमू त्याच्या घरी गेली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस