लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.नागपूर परिमंडळच्यावतीने २०१७-२०१८ या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करण्याऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात आला. महावितरणच्या बिजली नगर विश्रामगृहाच्या हिरवळीवर हा कार्यक्रम झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख, नागपूर ग्रामीण मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, शहर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, वर्धा मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता उमेश शहारे, विधी सल्लागार ताराचंद लालवानी, सहायक महाव्यस्थापक (मानव संसाधन) वैभव थोरात उपस्थित होते.नागपूर परिमंडळ कार्यालयाने दररोज चार थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची योजना नोव्हेंबर-२०१७ पासून अमलात आणली याचे चांगले परिणाम मागील आर्थिक वर्षात दिसल्याचेही खंडाईत म्हणाले.यावेळी नागपूर परिमंडलातील मौदा उपविभागाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या शिवाय प्रत्येक उपविभागातील दोन जनमित्र, शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकी दोन विभाग, प्रत्येक उपविभातील लेखा विभागातील लिपिक, शंभर टक्के मागणी वसूल करणारे शाखा अभियंता यांचा गुणगौरव करण्यात आला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता विजय मानकर, पी.एन. गुन्नाले, उपकार्यकारी अभियंता प्रफुल वैद्य, वैभव नारखेडे, गुणसागर नाईक, प्रशांत उईके, सहायक लेखापाल कुंदन शंभरकर, अनिल पिसे, पिरूसिंग राठोड, मनीष क्षीरसागर, महेश नायडू, विलास सत्रे यांच्यासह ६७ जनमित्रांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.संचालन मधुसूदन मराठे यांनी केले तर कार्यकारी अभियंता वंदना परिहार यांनी आभार मानले.
अचूक वीज देयक देणे ही सामूहिक जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 8:59 PM
येत्या आर्थिक वर्षात आपणास वीज ग्राहकांना अचूक देयक देण्यासोबतच मागणी वाढवायची आहे. वीज देयकाची व्यवस्था अचूकपणे अमलात आणल्यास वीज ग्राहकांना चुकीचे देयक जाणार नाहीत, ही सामूहिक जबाबदारी आहे, असे महावितरण नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सांगितले.
ठळक मुद्देप्रादेशिक संचालक खंडाईत : उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार