शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

निवडणुकीसंदर्भातील प्रचार साहित्य प्रमाणित करणे बंधनकारक : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 9:16 PM

लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील उमेदवार तसेच पक्षासाठी प्रचार करताना सर्व प्रचार साहित्यासाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीतर्फे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व बल्क एसएमएस पाठविण्यापूर्वी प्रमाणित करणे आवश्यक असून न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा एमसीएमसी समितीचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी दिलेत.

ठळक मुद्देएमसीएमसी समितीमार्फत २३ मुद्रित , इलेक्ट्रॉनिक माध्यमांना परवानग्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर व रामटेक मतदार संघातील उमेदवार तसेच पक्षासाठी प्रचार करताना सर्व प्रचार साहित्यासाठी जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीतर्फे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. तसेच सर्व बल्क एसएमएस पाठविण्यापूर्वी प्रमाणित करणे आवश्यक असून न करणाऱ्या उमेदवारांविरुद्ध निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा एमसीएमसी समितीचे अध्यक्ष अश्विन मुदगल यांनी दिलेत.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एमसीएमसी समितीची बैठक जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीत रामटेक लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवासी उपजिल्हाधिकारी व समितीचे सदस्य रवींद्र खजांजी, नोडल अधिकारी अनिल गडेकर, समितीचे सदस्य पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, गौरी मराठे, सायबर तज्ज्ञ राकेश माखेजा, यशवंत मोहिते, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे, मोईज हक, विजय करे, झाकीर पठाण आदी उपस्थित होते.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्या जिल्हा एमसीएमसी समिती गठित करण्यात आली असून या समितीमार्फत मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच सर्व समाज माध्यमांवर निवडणुकीसंदर्भातील जाहिरातीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची प्रमाणीकरण करण्यात येते. या समितीमार्फत रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघातील जाहिरात, होर्डिंग्ज आदी मुद्रित माध्यमांच्या ३६ उमेदवार प्रतिनिधी व पक्षांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावरील २३ उमेदवारांच्या प्रचार साहित्यांना समितीमार्फत प्रमाणित करण्यात आले आहे.एसएमएस सर्व्हिस प्रोव्हाईड करणाऱ्या ११७ कंपन्या आहेत. त्यापैकी पाच कंपन्या नागपूर व रामटेक परिसरात बल्क एसएमएसची सेवा देत असून या सर्व कंपन्यांनी जोपर्यंत एमसीएमसी समितीमार्फत प्रमाणित केल्याचे प्रमाणपत्र सादर करणार नाही तोपर्यंत उमेदवार अथवा राजकीय पक्ष एसएमएस स्वीकारु नये, अन्यथा निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाईस पात्र ठरतील, असे निर्देशही जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावेळी दिले. यावेळी पेड न्यूज विविध माध्यमांद्वारे सुरु असलेला उमेदवार अथवा पक्षाचा प्रचार सोशल मीडियावरील विविध माध्यमाद्वारे होत असलेला प्रचार इलेक्ट्रॉनिक माध्यम, केबल टीव्ही यावरील प्रचारासंदर्भात आढावा घेऊन प्रत्येक प्रचार साहित्य प्रमाणित झाले किंवा नाही यासंदर्भातही आढावा घेण्यात आला.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019