आरोपीला दया दाखविणे धोकादायक, हायकोर्टाचे निरीक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 04:17 AM2017-10-19T04:17:31+5:302017-10-19T04:17:50+5:30

आरोपीवर विनाकारण दया दाखविणे न्यायव्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. त्यामुळे समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असे निरीक्षण नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात नोंदविले.

It is dangerous to show mercy to the accused, see the High Court | आरोपीला दया दाखविणे धोकादायक, हायकोर्टाचे निरीक्षण

आरोपीला दया दाखविणे धोकादायक, हायकोर्टाचे निरीक्षण

Next


- राकेश घानोडे
नागपूर : आरोपीवर विनाकारण दया दाखविणे न्यायव्यवस्थेसाठी धोकादायक ठरते. त्यामुळे समाजाचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असे निरीक्षण नागपूर खंडपीठाने विनयभंगाच्या एका प्रकरणात नोंदविले. बचाव पक्षाच्या वकिलाने विनयभंग प्रकरणात आरोपी नौशाद छोटेखा याच्यावर दया दाखविण्याची विनंती न्यायालयाला केली होती. घटनेच्या वेळी आरोपी केवळ २० वर्षांचा होता. त्यामुळे त्याला सत्र न्यायालयाने सुनावलेली सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा कठोर आहे, असा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला होता. न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला.
अमरावतीतील घटना
आरोपीने ५ सप्टेंबर २००१ रोजी अंधाराचा फायदा घेऊन तरुणीला अडवले व तिचा विनयभंग केला. ही घटना अमरावती जिल्ह्यातील दत्तपूर येथील आहे.

Web Title: It is dangerous to show mercy to the accused, see the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.