लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत आवश्यक बदल करणे तसेच शेतमालावर प्रक्रिया उद्याेग उभारणे गरजेचे आहे. प्रक्रिया उद्याेग उभारण्यासाठी सध्याचा काळ अतिशय याेग्य आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी मसला (ता. रामटेक) येथे कृषिदिन व कृषी संजीवनी अभियानाच्या समाराेपीय कार्यक्रमात केले. तालुक्यात २१ जून ते १ जुलै या काळात कृषी संजीवनी अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी खंडविकास अधिकारी प्रदीप बमनाेटे, वनपरिक्षेत्र अधिकारी बाेलके उपस्थित हाेते. कृषी संजीवनी अभियानांतर्गत शेतकऱ्यांना निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन, त्यावर प्राथमिक प्रक्रिया, राज्य शासनाचा ‘पिकेल ते विकेल’ उपक्रम, नावीन्यपूर्ण शेती, अन्नप्रक्रिया, यासह अन्य बाबींचे मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व बाबींचा आढावाही या कार्यक्रमात घेण्यात आला. तालुका कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी रबी पीक स्पर्धा घेण्यात आली हाेती. या स्पर्धेचे निकाल जाहीर करीत विजेत्या शेतकऱ्यांचा अतिथींच्या हस्ते गाैरव करण्यात आला.
...
गहू, हरभरा गटातील विजेते शेतकरी
गहू गटात प्रति हेक्टरी ४१ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या सुरेश कुथे, रा. किरणापूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून, प्रति हेक्टरी ३७ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेणाऱ्या भाेलाराम बिरणवार, रा. नगरधन यांनी द्वितीय व ३४ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या रवींद्र भाेंदे, रा. शिरपूर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. हरभरा गटात हरभऱ्याचे प्रति हेक्टरी ३५.२६ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या गजेंद्र सावजी, रा. पटगाेवरी यांनी प्रथम, ३१.१५ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या सुंदरलाल कान्बते, रा. पटगाेरी यांनी द्वितीय व २९.७१ क्विंटल उत्पादन घेणाऱ्या काशीनाथ ताेंडरे, रा. सराखा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या सर्व शेतकऱ्यांचा यावेळी गाैरव करण्यात आला.