शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

अभ्यास किती केला यापेक्षा कसा केला हे महत्त्वाचे

By admin | Published: May 13, 2016 3:16 AM

‘युपीएससी’ची परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात.

‘लोकमत’ व्यासपीठावर भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा यशोमंत्र : आत्मविश्लेषण करण्याचा सल्लानागपूर : ‘युपीएससी’ची परीक्षा देऊन भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात. परंतु यश मिळविण्यासाठी दररोज १४ ते १८ तास अभ्यास करावाच लागेल व ते आपल्याला जमेलच की नाही, याबाबत त्यांना साशंकता असते. या परीक्षेत यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत तर लागतेच. परंतु अमूकतमूक तास अभ्यास करण्यापेक्षा आहे त्या वेळात दर्जेदार अभ्यास करण्यावर भर देणे आवश्यक आहे. नियोजनबद्ध अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ‘युपीएससी’च्या निकालात यश मिळविणाऱ्या उमेदवारांनी ‘लोकमत व्यासपीठ’च्या माध्यमातून यशाचा हा मंत्र दिला आहे.या आठवड्यातच ‘युपीएससी’च्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर चांगली ‘रँकिंग’ मिळविलेल्या उमेदवारांनी गुरुवारी ‘लोकमत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली व संपादकीय सहकाऱ्यांसोबत चर्चा केली. या भावी अधिकाऱ्यांमध्ये अश्विनी कुमार पांडे (क्र. ३४), सत्यप्रकाश (क्र. २३७), तोरल रविश (क्र. ४९), श्रीवत्स सेहरा (क्र. ९२) व अभिनव गोयल (क्र. ३६) यांचा समावेश होता. यावेळी या सर्व यशस्वी उमेदवारांनी आपल्या यशाचे रहस्य तर सांगितलेच, शिवाय भविष्यातील संकल्पनादेखील मांडल्या. हे सर्व उमेदवार नागपूरच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर अकादमीत भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण घेत आहेत, हे विशेष. कुठल्याही परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यकच असते. ‘युपीएससी’ची परीक्षा देण्याची तयारी सुरू करण्याअगोदर विद्यार्थ्यांनी स्वत:च्या क्षमतेचे परीक्षण करणे जास्त आवश्यक आहे. यातून समोरची दिशा स्पष्ट होऊ शकते. विशेष म्हणजे यातून स्वत:मधील कमतरता आणि त्रुटी लक्षात येतात. त्यांना दूर करून तयारीला सुरुवात करणे कधीही चांगले असते, असे मत या उमेदवारांनी व्यक्त केले.सुरुवात करणे जास्त महत्त्वाचेपरीक्षेची तयारी करताना सुरुवातीपासूनच अनेक अडथळे येतात. सर्वात मोठा प्रश्न हा असतो की, अभ्यासाची नेमकी सुरुवात कुठून करायची. याशिवाय काय वाचावे, कुठली पुस्तके घ्यावीत, यासारखे प्रश्नदेखील असतात. या संभ्रमावस्थेतच बराच वेळ जातो. त्यामुळे संभ्रमात फसण्याऐवजी आहे तिथून अभ्यासाला सुरुवात करणे कधीही श्रेयस्कर ठरते, असे या पाचही यशस्वी उमेदवारांचे म्हणणे होते.नागपूर खरोखरच ‘गुड सिटी’‘यूपीएससी’च्या परीक्षेत यश मिळविलेले हे पाचही उमेदवार केंद्रीय प्रत्यक्ष कर अ‍ॅकेडमी येथे भारतीय महसूल सेवेचे प्रशिक्षण घेत आहेत. आता यातील चौघे जण भारतीय प्रशासकीय सेवेत जाणार आहेत. गेल्या ५ महिन्यांत या सर्वांना नागपूरने आपलेसे केले आहे. नागपूरची शांती, येथील हिरवळ, स्वच्छता यांच्या प्रेमातच पडले आहेत. या शहराने नवा हुरूप दिला व आयुष्यभर येथील आठवणी स्मरणात राहतील, अशा भावना या यशस्वी उमेदवारांनी व्यक्त केल्या.‘कोचिंग क्लास’चा आग्रह नकोपरीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये सर्वसाधारणपणे एक समज असतो की यश मिळविण्यासाठी महागडे ‘कोचिंग क्लास’ लावणे आवश्यकच असते. परंतु ‘कोचिंग क्लास’मुळे फारसा फायदा होत नाही. उलट अनेकदा तर वेळच वाया जातो. त्यांच्याशिवायदेखील अनेक उमेदवार सहजपणे यश मिळवितात. तेथे काहीही नवीन शिकायला मिळत नाही. याउलट उमेदवारांनी स्व-अभ्यासावर जास्त भर दिला पाहिजे, असा सल्ला या सर्व उमेदवारांनी दिला.महिलांना सक्षम बनविण्यावर भरपरंपरेला छेद देत करिअरसाठी भारतीय प्रशासकीय सेवेची निवड करणाऱ्या तोरल रविशने आपली निवड योग्य असल्याचे सांगितले. भारतीय प्रशासकीय सेवेत काम करत असताना खासगी व व्यावसायिक जीवनाचा समतोल साधता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे देशाची सेवा करता येते. आपल्या देशात महिलांचा विकास होण्यासाठी अभ्यास व आरोग्यक्षेत्रांवर भर देण्याची गरज आहे. लोकसेवक म्हणून काम करताना यावरच माझा भर राहील. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे आवश्यक आहे. यातून त्यांच्यात आत्मविश्वास व स्वाभिमान निर्माण होतो. ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनविण्यासाठी अल्पबचत गट हे मोठे माध्यम ठरू शकते. यादृष्टीनेच माझे प्रयत्न राहतील.-तोरल रविशअखिल भारतीय क्रमांक : ४९