लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वे विश्वस्तरीय असून ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. फिडर सर्व्हिस जेवढी सक्षम होईल, तेवढेच लोकांना जास्त जोडता येईल. कोणतीही योजना अमलात आणणे सोपे आहे, पण त्याला लोकोपयोगी बनविणे तेवढेच कठीण आहे. मेट्रो रेल्वे फिडर सर्व्हिससह मनपा बससेवा, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस टर्मिनल ते मेट्रो स्थानकापर्यंत जोडणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (महामेट्रो) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी येथे केले.महामेट्रोच्यावतीने आणि मनपा अणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूटच्या (डब्ल्यूआरआय) सहकार्याने ‘एनहान्सिंग द अॅक्सेस टू अॅन्ड कनेक्टिव्हिटी आॅफ नागपूर’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचा शुभारंभ हॉटेल सेंटर पॉर्इंट, रामदासपेठ येथे बुधवारी झाला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नागपूर स्मार्ट व सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सोनवणे, डब्ल्यूआयआयच्या प्रेरणा मेहता आणि छवी ढिंगरा प्रामुख्याने उपस्थित होते.दरदिवशी ३.५ लाख लोक प्रवास करणारदीक्षित म्हणाले, मेट्रो रेल्वेचा उपयोग योग्यरीत्या केल्यास त्याचा लोकांना फायदा मिळेल. नागपूर मेट्रो रेल्वेची लाईन वा स्टेशन बनविणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच लोकांना जोडणे जास्त महत्त्वाचे आहे. सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० टक्के आहे. त्यानंतरही मेट्रो रेल्वेची गरज का आहे, हे लोकांना अजूनही समजले नाही. लोकांना शहरात लांबचा प्रवास करताना दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे वेळ वाया जातो आणि पैसा खर्च होतो, तसेच अपघात होण्याची शक्यता असते. वाहनांमुळे पर्यावरणाला धोका वाढतो. टीओडीवर चर्चा करताना ते म्हणाले, मेट्रो रेल्वेमुळे ५०० मीटरच्या कॅरिडोरमध्ये व्यावसायिक उपक्रम वाढतील. लोकसंख्येनुसार मेट्रोतून दरदिवशी ३.५० लाख लोक प्रवास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.रामनाथ सोनवणे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून परिवर्तन होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था १० वरून ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे आमचे लक्ष्य आहे. नागपूर शैक्षणिक आणि वैद्यकीय हब बनत आहे. या दिशेने आम्हाला ठोस कार्य करणे आवश्यक आहे.कार्यक्रमाची रूपरेखा संयुक्त महाव्यवस्थापक (मल्टीमॉडेल इन्टिग्रेशन) महेश गुप्ता यांनी सादर केली. संदीप बापट यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या वेळी महामेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मेट्रो रेल्वेला मनपा बससेवेने जोडणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 2:33 AM
मेट्रो रेल्वे विश्वस्तरीय असून ही एक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. फिडर सर्व्हिस जेवढी सक्षम होईल, तेवढेच लोकांना जास्त जोडता येईल.
ठळक मुद्देमेट्रो रेल्वे फिडर सर्व्हिससह मनपा बससेवा, रेल्वे स्थानक, विमानतळ आणि बस टर्मिनल ते मेट्रो स्थानकापर्यंत जोडणे आवश्यक