मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 09:53 PM2020-12-22T21:53:25+5:302020-12-22T21:54:37+5:30
Not a crime to keep dead animals skin , High court महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ अनुसार मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. तसेच, यासंदर्भातील वादग्रस्त एफआयआर रद्द केला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम-१९७६ अनुसार मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने दिला. तसेच, यासंदर्भातील वादग्रस्त एफआयआर रद्द केला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
गोवंशाची १८७ कातडी आढळून आल्यामुळे हिवरखेडा, ता. तेल्हारा, जि. अकोला येथील शफिकउल्लाह खा अश्फाकउल्लाह खा यांच्याविरुद्ध खामगाव पोलिसांनी १५ जुलै २०१८ रोजी एफआयआर नोंदवला होता. तो एफआयआर रद्द करण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने कायद्यातील तरतुदी लक्षात घेता ती याचिका मंजूर केली. मृत जनावरांची कातडी बाळगणे गुन्हा असल्याचे कायद्यात कुठेही नमूद नाही. त्यामुळे शफिकउल्लाह खा यांच्यावरील कारवाई कायम ठेवली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने सांगितले.