शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

हिवाळी अधिवेशन: ही शिवसेना नव्हे तर 'सोनियासेना'; भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 2:27 PM

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घेतलेला आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला.

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका करताना शिवसेनेचा प्रवास शिवसेना ते सोनियासेना असा झाला आहे असा हल्ला चढविला. सभागृहात बॅनर घेऊन आंदोलन करण्याची प्रथा सध्याच्या सत्ताधाऱ्यांनीच आणली असून त्यांनी जनतेला दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे असा आरोप मुनगंटीवार यांनी केला. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपा आमदारांकडून सभागृहात बॅनरबाजी करण्यात आली. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सभागृहात जे काही होतं ते रेकॉर्ड होत असतं. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये मदत द्यावी. जे तुम्ही लोकांना आश्वासन दिलं ते कधी देणार याची विचारणा आम्ही करतोय, आयुधांचा उपयोग करुन सत्ताधारी पार्टीने जनतेला जी आश्वासनं दिली ती पूर्ण करावी. वचननाम्यात जे शेतकऱ्यांसाठी मदतीच आश्वासन दिलं ते पूर्ण करा, बॅनर घेऊन आल्याचा राग का काढता? मुद्द्याऐवजी गुद्द्यावर चर्चा करता का? असा सवाल त्यांनी केला. 

तत्पूर्वी शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, अतिवृष्टी या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेतकऱ्यांना तातडीनं मदत जाहीर करा, अशी मागणीच त्यांनी सत्ताधाऱ्यांकडे केली आहे. विधानसभेच्या बाहेर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  ते म्हणाले, आमचं काळजीवाहू सरकार होतं, त्यावेळी आम्ही कॅबिनेटमध्ये 10 हजार कोटी रुपयांना मान्यता दिली होती. त्यानंतर आमचं सरकार नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यासंदर्भातले जीआर काढू शकलो नाहीत असं त्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात घेतलेला आक्रमक पवित्रा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी स्वत: अनेकवेळा रस्त्यावर उतरलो आहे. वचन मोडलं तर आम्ही कसे वागतो, हे लोकांना कळलंय. जनतेला याची खात्री पटलीय, त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आश्वासन पाळणार हेही त्यांना कळलंय, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारShiv SenaशिवसेनाBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन