वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार 

By कमलेश वानखेडे | Published: April 16, 2023 05:20 PM2023-04-16T17:20:29+5:302023-04-16T17:20:53+5:30

राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील की नाही, अशा चर्चा होत्या.

It was already decided that only two leaders of each party would speak in the Vajramuth meeting says Ajit Pawar | वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार 

वज्रमुठ सभेत प्रत्येक पक्षाचे दोनच नेते बोलतील हे आधीच ठरले होते - अजित पवार 

googlenewsNext

नागपूर: राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे नागपुरातील वज्रमुठ सभेला येतील की नाही, अशा चर्चा होत्या. मात्र, रविवारी सकाळी नागपुरात दाखल होत त्यांनी या चर्चांना विराम दिला. पवार हे सभेला आले असले तरी ते सभेत भाषण देणार नाहीत. तर काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सभेला येणार नाहीत, असे त्यांनी ट्वीट करीत स्पष्ट केले आहे. 

नागपुरात दाखल झाल्यावर अजित पवार म्हणाले, सभांमध्ये प्रत्येक पक्षाच्या दोन मान्यवरांनी भाषणं करायची. ती कुणी दोघांनी करायची ते त्या त्या पक्षाने ठरवायच होते. नागपूरच्यासभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सभा नमागपुरात होत असल्यामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आधीच ठरले होते, असे पवार यांनी सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. छत्रपती संभाजी नगरच्या सभेत काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाणांनी भाषण केले. आपण आणि धनंजय मुंडें तर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत खैरैंनी भाषण केले. अंबादास दानवे संभाजीनगरचे असले तरी दोघांची नावे दिल्याने ते बोलले नाहीत. ही विदर्भातली सभा आहे. अनिल देशमुख विदर्भातले आहेत आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून हे दोन नेते बोलतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अशोक चव्हाण येणार नाहीत
काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे नागपूरच्या सभेला अनुपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात चव्हाण यांनी सभेपूर्वीच ट्विट करून माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने नागपूर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना याबाबत पूर्वकल्पना दिली आहे, असे त्यांनी द्वीटद्वारे स्पष्ट केले. पण एवढ्या महत्वाच्या सभेसाठी चव्हाण हे खरच एक दिवसाचा वेळ काढू शकले नाहीत की यामागे त्यांचीही कुठली नाराजी आहे, अशी चर्चा काँग्रेस वतुर्ळात रंगली होती. 
 

Web Title: It was already decided that only two leaders of each party would speak in the Vajramuth meeting says Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.