गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करता येते. परंतु दिव्यांग असल्याने बºयाच अडचणी येतात. त्या अडचणींचाही सामना करीत पाऊल टाकणाºयांपैकीच एक आहे चिंधूभाऊ सुरजुसे. तब्बल ३० वर्षे शासकीय सेवा करून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र निरोपाच्या क्षणी त्यांनी खंत व्यक्त करीत सर्वांना बुचकळ्यात पाडले. ‘ग्रामसेवक म्हणून रुजू झालो असताना ३० वर्षाच्या सेवाकाळात पदोन्नतीचा लाभ मिळवत मोठा अधिकारी झालो असतो. मात्र कुटील धोरणामुळे मला चपराशाची कामे करावी लागली’ ही त्यांची खंत होती.स्वेच्छानिवृत्तीनिमित्त त्यांचा काटोल पंचायत समितीतर्फे छोटेखानी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांनी मनोगत व्यक्त करताना ही खंत व्यक्त केली. सोबतच अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोदे, खंडविकास अधिकारी साने, विस्तार अधिकारी मधुकर पारधी, पी. एस. शेंडे, कृषी अधिकारी गोरटे, तालुका पशुविकास अधिकारी अनिल ठाकरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. पारडसिंगा रहिवासी चिंधू सुरजुसे यांनी सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती घेतली. यानिमित्त त्यांना समारंभाद्वारे निरोप देण्यात आला. सोबतच काटोलपासून पारडसिंगापर्यंत वाजतगाजत, गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. या सत्कारामुळे भारावून गेलेल्या चिंधूभाऊंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत अनेक आठवणींना उजाळा दिला.चिंधूभाऊ म्हणाले, ठेंगणा म्हणून जन्माला आल्यानंतर मला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वर्गमित्रांसह शाळेतील विद्यार्थी मला चिडवित. काही मला सायकलवर बसवून, कडेवर घेऊनही फिरवायचे. आई-वडिलांपुढे शिक्षणाचा हट्ट धरला आणि तो त्यांनी पूर्ण केल्याने शेतकी शाळेत कृषी पदविकापर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर १९८६ मध्ये ग्रामसेवक म्हणून नागपूर जिल्हा परिषदेत रुजू झालो. परंतु तत्कालीन मुख्य कार्यपालन अधिकाºयांच्या धोरणामुळे मला ग्रामसेवकपदावर कार्य करण्यापासून रोखले आणि चपराशापासून हमालीपर्यंतची कामे करावी लागली. या काळात अनेक चांगले-वाईट प्रसंग वाट्याला आले. कुणी मदत केली, कुणी दूर पळाले. शासकीय सेवेत ३० वर्षे देत पूर्णपणे जीव लावून काम केले’ असेही त्यांनी सांगितले.आगळीवेगळी ‘आॅफर’ठेंगणा, कमी उंचीचा असल्याने सर्कशीत जाण्याचा अनेकांनी सल्ला दिला. एवढेच काय तर सर्कसवाले घरापर्यंत आले होते, अशी आठवणही चिंधूभाऊंनी स्वेच्छानिवृत्तीनिमित्त सत्काराला उत्तर देताना काढली. सर्कसवाले घरापर्यंत आले, मात्र माझ्या आई-वडिलांनी त्यांना परत पाठविले. तसे केले नसते तर कदाचित मी सर्कशीतही राहिलो असतो, असा प्रसंग सांगत ते भावूक झाले. ३० वर्षांच्या शासकीय सेवाकाळात नागपूर जिल्हा परिषदेंतर्गत त्यांनी विविध विभागात आणि वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिली. जिथे गेले तेथे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाºयांसोबत स्वत:चे नातेसंबंध दृढ केले. त्यामुळे त्यांना सर्वत्र ओळखले जाते. काटोल पंचायत समितीतही त्यांनी सर्वांना आपलेसे केले. सहा महिन्यांपूर्वीच चिंधूभाऊंच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे ते काही दिवसांपासून थोडे अस्वस्थ दिसत होते. अखेर स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
-तर आज मोठा अधिकारी असतो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:45 AM
जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर यश प्राप्त करता येते. परंतु दिव्यांग असल्याने बºयाच अडचणी येतात. त्या अडचणींचाही सामना करीत पाऊल टाकणाºयांपैकीच एक आहे चिंधूभाऊ सुरजुसे.
ठळक मुद्दे चिंधूभाऊंची खंत : दिव्यांगत्वावर मात करीत ३० वर्षे शासकीय सेवा