शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
2
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
3
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
4
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
5
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
6
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 
7
"मतदानाची वेळ संपल्यावर ७.८३ टक्के मतांची वाढ झाली कशी?", नाना पटोलेंचा निवडणूक आयोगाला सवाल
8
मी मोदी सरकारसोबत उभी ठाकणार; ममता बॅनर्जींचे भर विधानसभेत मोठे वक्तव्य 
9
Chhagan Bhujbal: देवेंद्र फडणवीस यांनी झोकून काम केलंय; ते मुख्यमंत्री झाले तर आनंदच होईल - छगन भुजबळ
10
बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या चिन्मय प्रभूंशी इस्कॉनने संबंध तोडले; कोणत्याही कामासाठी जबाबदार नसल्याचे सांगितले
11
१५ हजार एकर जमीन, हजारो कोटी रुपये किंमत, पण वारस नाही, या राजघराण्याची मालमत्ता सरकारने घेतली ताब्यात
12
Ajmer Sharif: "आता चंद्रचूड प्रत्येक ठिकाणी मुलाखती देत बसलेत"; असदुद्दीन ओवेसी भडकले 
13
बांगलादेशातील इस्कॉनला मिळाला मोठा दिलासा! उच्च न्यायालयाने बंदी घालण्यास दिला नकार
14
'प्यार का पंचनामा' फेम लोकप्रिय अभिनेत्री झाली आई, लग्नानंतर दीड वर्षांनी आयुष्यात आली छोटी पाहुणी
15
शरद पवार गटाला ७२ लाख मते पण १०च जागा जिंकले, अजितदादा गटाला ५८.१ लाख मते पण ४१ जागा जिंकले
16
प्रकाश आंबेडकरांना सोबत न घेणे भोवले? मविआला २० ठिकाणी फटका; सर्वाधिक नुकसान शरद पवारांचे!
17
Blast in Delhi: राजधानी दिल्लीत मोठा स्फोट; तपास यंत्रणा अलर्ट मोडवर
18
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
19
सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत
20
खळबळजनक! गुजरातमध्ये सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची मुद्दाम केली अँजिओप्लास्टी

अपघात दाव्याप्रमाणे पोटगी ठरविणे चुकीचे

By admin | Published: July 14, 2017 2:34 AM

कामगार भरपाई कायदा किंवा मोटार अपघात प्रकरणाप्रमाणे पोटगी निश्चित करणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चुकीचे ठरविले आहे.

हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : एकमुस्त पोटगीचा वादग्रस्त आदेश रद्दराकेश घानोडे। लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामगार भरपाई कायदा किंवा मोटार अपघात प्रकरणाप्रमाणे पोटगी निश्चित करणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चुकीचे ठरविले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे कनिष्ठ न्यायालयांतील प्रक्रियेला योग्य दिशा मिळणार आहे.नागपूर कुटुंब न्यायालयाने पत्नीला वादग्रस्तरीत्या पोटगी निश्चित करून दिली होती. पोटगी निश्चित करताना पत्नीचे त्यावेळचे वय, भारतीय महिलांचे सरासरी वयोमान, पतीचे मासिक वेतन व पतीची बचत करण्याची क्षमता याचे गणित करण्यात आले होते. त्यानुसार पत्नीस ४ लाख ३२ हजार रुपयांची एकमुस्त पोटगी देण्याचा आदेश पतीला देण्यात आला होता. त्यावेळी पत्नीचे वय २९ वर्षे होते. भारतीय महिलांचे सरासरी वयोमान ६५ वर्षे, पतीचे मासिक वेतन ६,७८२ रुपये व पतीची पत्नीसाठी मासिक १००० रुपये बचत करण्याची क्षमता हे गृहित धरण्यात आले होते. अशाप्रकारे पोटगी निश्चित करण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यावेळी पतीचे वय केवळ २८ वर्षे होते. त्या वयात पतीने ४ लाख ३२ हजार रुपयांची बचत केली असेल काय, याचा विचार करण्यात आला नाही. पत्नीसाठी मासिक एक हजार रुपयांची बचत गृहित पकडली तरी तो पुढे ३० वर्षांवर नोकरी केल्यावरही एवढी रक्कम वाचवू शकत नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालयाचा वादग्रस्त आदेश अत्यंत कठोर आहे. त्या आदेशात पतीप्रमाणे पत्नीच्या उत्पन्नाचा काहीच उल्लेख केला गेलेला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवून वादग्रस्त आदेश रद्द केला व पत्नीला मासिक १५०० रुपये पोटगी देण्यात यावी, असा निर्णय दिला. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व अरुण उपाध्ये यांनी दिलेला हा निर्णय कनिष्ठ न्यायालयांतील प्रक्रियेला शिस्त लावणारा आहे.