शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: "चार गोष्टी मनासारख्या होतील, चार विरुद्ध होतील"; फडणवीसांचा इच्छुकांना मेसेज
2
देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची पत्रिका व्हायरल; बघा, त्यांच्यासोबत कोण-कोण घेणार शपथ?
3
'त्या' संघर्षातही आमदारांनी साथ सोडली नाही, आज इतिहास घडला - देवेंद्र फडणवीस
4
Devendra Fadnavis : नगरसेवक ते मुख्यमंत्री...अशी आहे देवेंद्र फडणवीस यांची झंझावाती राजकीय कारकीर्द!
5
डिफेन्स स्टॉक्सची मोठी झेप; ₹२१७७२ कोटींच्या अधिग्रहण प्रस्तांवाना मंजुरी; कोणते आहेत शेअर्स?
6
"आता मला लवकर लग्न करायचंय; ३ मुलांना जन्म द्यायचाय, जर दोन वर्षांत मुलगा..."
7
रशिया हल्ला करणार? युरोपमध्ये चाललीय तिसऱ्या विश्वयुद्धाची तयारी; जर्मन गुप्तचर संघटनेच्या दाव्याने खळबळ
8
मार्गशीर्षाचा पहिला गुरुवार: ७ राशींवर धनलक्ष्मी कृपा, लॉटरीतून लाभ; अपार यश, भरभराटीचा काळ!
9
"दिल्लीत येण्याआधी खूप विचार करतो कारण..."; गडकरींची राजधानीपासून दूर राहण्याला पसंती
10
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरला! भाजपा विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड
11
"मी अशा राज्यातून येते, जिथे हिंदी शिकणं गुन्हा वाटतो"; निर्मला सीतारामन लोकसभेत भडकल्या
12
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठं यश; मनी ट्रेल, फंडिंगचे मिळाले पुरावे
13
महिंद्राच्या नवीन इलेक्ट्रिक कारवर बंदी येणार? इंडिगो एअरलाईन्सने खेचलं कोर्टात; काय आहे प्रकरण?
14
IndiGo चा समावेश सर्वात खराब एअरलाईन्सच्या यादीत; 'ही' आहे सर्वात चांगली विमान कंपनी
15
खेडेगावातील लेकीने रचला इतिहास; एकाच वेळी ३ सरकारी नोकऱ्या, आता IAS होण्याचं स्वप्न
16
मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!
17
Pushpa 2 Review: अल्लू अर्जुन नव्हे तर 'या' कलाकाराने गाजवला 'पुष्पा 2'! सिनेमाचा पहिला रिव्ह्यू समोर
18
राहुल गांधींच्या संभल दौऱ्यावरून काँग्रेस-सपामध्ये मतभेद, रामगोपाल यादव म्हणाले...
19
मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावण्यासाठी अभिनेत्याला मिळाले पैसे, म्हणाला- "पांढरे कपडे घालून यायला सांगितलं आणि..."

इतवारीतील औषध व्यापाऱ्याने घेतला गळफास : नागपुरात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:19 PM

कर्जामुळे त्रस्त होऊन शहरातील एका मोठ्या औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इतवारीतील निकालस मंदिरजवळ घडली. या घटनेमुळे व्यापारी हादरले आहेत. विनोद चिमणदास रामानी (४४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे.

ठळक मुद्देकर्जामुळे होते त्रस्त : दोन दिवसांपूर्वीच केली आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कर्जामुळे त्रस्त होऊन शहरातील एका मोठ्या औषध व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना इतवारीतील निकालस मंदिरजवळ घडली. या घटनेमुळे व्यापारी हादरले आहेत. विनोद चिमणदास रामानी (४४) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. 

रामानी अगोदर जरीपटक्यातील आहुजानगर येथे राहत होते. काही दिवसांपूर्वी ते निकालस मंदिरजवळील कीर्ती अपार्टंमटमध्ये राहायला आले होते. त्यांचा पूर्व नागपुरात औषधांचा मोठा व्यवसाय आहे. गंगा-जमुना चौकात एका औषधीच्या दुकानापासून त्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात केली होती. नंतर निकालस मंदिरजवळ दुकान उघडले. यानंतर एकेक करीत निकालस मंदिर, सतरंजीपुरा आणि वर्धमाननगरातील अपॅक्स मेडिकोजच्या नावाने सहा-सात दुकाने झाली. रामानी यांच्या सर्व दुकानांमध्ये दररोज लाखो रुपयांची विक्री होत होती. व्यवसाय चांगलाच चालू लागल्याने रामानी हे फिल्म इंडस्ट्री आणि दुसऱ्या व्यवसायातही गुंतवणूक करू लागले. यासाठी सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर कर्जही घेतले होते. या कर्जाची गुंतवणूक औषध व्यापारासह चित्रपट व्यवसायातही केली. यादरम्यान विनोदची आर्थिक परिस्थिती बिघडली. विनोदने सावकारांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज व्याजाने घेतले होते. व्याज चुकते करण्यातच लाखो रुपये खर्च होत होते. व्याज व मूळ रक्कम फेडण्यास अडचण येत असल्याने विनोद प्रचंड तणावात होते. यामुळे कुटुंबातील सदस्यांवरही संतापत होते.असे सांगितले जाते की, शनिवारी सकाळी रामानी यांनी पत्नी आणि मुलांशी वाद घातला. त्यांना घरातून निघून जाण्यास सांगितले. पतीचा स्वभाव माहीत असल्याने पत्नी भावना आपला मुलगा व मुलीला घेऊन कुटुंबीयांकडे जरीपटका येथे निघून गेल्या. गेल्यानंतर पत्नीने पतीची विचारपूस करण्यासाठी रामानी यांना फोन केला. परंतु कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने कुटुंबीय चिंतेत पडले. सोमवारी सकाळी अपार्टमेंटमधील लोकांना रामानी यांच्या फ्लॅटमध्ये दुर्गंधी पसरल्याचे जाणवले. अपार्टमेंटच्या खालच्या भागातच दुकान आहे. शेजाऱ्यांनी रामानी यांच्या कर्मचारी व कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय लगेच फ्लॅटवर पाहोचले. दरवाजा आतून बंद होता. तो तोडण्यात आला. तेव्हा रामानी सिलींग फॅनला फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृताची अवस्था पाहून विनोद यांनी दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. तहसील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत तपास सुरू केला आहे.पैसे दे किंवा जीव देमिळालेल्या माहितीनुसार रामानी यांच्यामागे सावकार सातत्याने पैशासाठी तगादा लावत होता. त्याने रामानी यांना ‘माझे पसे दे किंवा जीव दे‘ असे म्हटले होते. हा सावकार दबंग प्रवृत्तीसाठी ओळखला जातो. असे सांगितले जाते की, रामानी यांच्यावर कर्जाचे पैसे परत करण्यासाठी प्रचंड दबाव होता. ते निकालस मंदिरस्थित औषध दुकानाची इमारत विकण्याच्या तयारीत होते. पाच कोटी रुपये किंमतही ठेवली होती. याशिवाय इतर संपत्तीही विकण्याची योजना बनवत होते. यादरम्यान त्यांनी गळफास घेतला.कर्जाची रक्कम २० कोटी रुपयेमिळालेल्या माहितीनुसार विनोद यांनी सावकार व त्याच्या दलालाकडून जवळपास २० कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. यावर दर महिन्याला दोन टक्के व्याज भरावे लागत होते. याच्या व्याजाची रक्कमच ४० लाख रुपये महिना पडत होती. विनोद व्यापारात हुशार होते. ते औषध विक्रीशिवाय खरेदीतूनही कमाई करीत होते. दर महिन्याला व्यवसायात लाखो रुपयांचा लाभ मिळत असूनही त्यांना व्याज फेडणे शक्य होत नव्हते. त्यांच्या कुटुंबीयांनीसुद्धा मध्यस्ती करून सावकारांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता.सावकारांमध्ये खळबळविनोद यांनी आत्महत्या केल्यामुळे सावकारांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात सावकार आणि दलाल म्हणून काम करणारे २० ते ३० जण सक्रिय आहेत. यात ८ ते १० मोठे सावकार आहेत. त्यांचा शहरातील व्यापारावर कब्जा आहे. ते उद्योजक, नेता, शासकीय अधिकारी, डॉक्टर, वकील आदींना होणारी दोन नंबरची कमाई विनोदसारख्या व्यापाºयांना व्याजावर देतात. सुरुवातीला वेळेवर व्याज आणि मूळ रक्कम परत करीत असल्याने विनोद यांना सहजपणे व्याज मिळत होते. विनोद यांच्या आत्महत्येमुळे आपले पितळ उघडे पडेल, या भीतीने अनेक सावकार भूमिगत झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या