लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे.बुधवारी दुपारी खास पिंजऱ्यातून एनटी-१ या वाघाला गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामधून येथे आणण्यात आले. चार जणांचे बळी घेणाºया या नर वाघाला ब्रह्मपुरी येथून १९ जुलैला जेरबंद करून आणले होते. देखभाल आणि उपचारासाठी त्याला गोरेवाडामध्ये ठेवण्यात आले होते. मागील तीन वर्षांपासून महाराज बाग प्राणिसंग्रहालयाकडून एका नर वाघाची मागणी सातत्याने केली जात होती. यासाठी वारंवार पत्रव्यवहार सुरू होता. ही गरज लक्षात घेऊन केद्रींय चिडीयाघर प्राधिकरणानेही या वाघिणीला जोडीदार आणण्यासाठी हिरवी झेंडी दिली होती. त्यामुळे मुख्य वन्यजीवरक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी पत्रद्वारे मंगळवारीच या संदर्भात आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी बुधवारी तातडीने करण्यात आली. पुढील आदेशापर्यंत या वाघाला येथे ठेवले जाणार आहे.नागरिकांना पाहण्यासाठी नाहीपुढील काळात एनटी-१ ला निसर्गमुक्त करावे किंवा कायम पिंजऱ्यात ठेवावे याबद्दल समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांना पाहता यावे यासाठी सध्यातरी अनुमती नाही. या संदर्भात सीझेडचे आदेश आल्यावर निर्णय घेतला जाणार आहे.ही मागणी पूर्ण होण्यात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांचे मोठे योगदान आहे. नागपूरकरांचीही या मागणीला साथ होती. त्याला आता यश आले आहे. पुढील निर्णयानंतर वाघाची जोडी नागरिकांना पाहण्यासाठी ठेवली जाईल.- सुनील बावसकर, प्रभारी व्यवस्थापक, महाराज बाग प्राणिसंग्रहालय
महाराज बागेतील ‘जान’ला मिळाला जोडीदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2020 10:28 PM
मागील काही वर्षांपासून एकाकी जीवन जगत असलेल्या ‘जान’ वाघिणीला आता जोडीदार मिळाला आहे. प्रधान मुख्य वनरक्षक कार्यालयाने परवानगी दिल्याने ब्रह्मपुरीहून आणलेला एनटी-१ हा नर वाघ आता महाराज बागेत दाखल झाला आहे.
ठळक मुद्देतीन वर्षांची प्रतीक्षा संपली : ब्रह्मपुरीचा एनटी-१ मिळाला