लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर साजरा केला जातो. या निमित्ताने सोमवारी संविधानदिनी शहरात ठिकठिकाणी संविधान जनजागृत रॅली काढण्यात आली. कुठे व्याख्यान व जनजागृती कार्यक्रमांद्वारे संविधानाचा जागर करण्यात आला. दीक्षाभूमी आणि संविधान चौक नागरिकांनी विशेष गजबजले होते. राजकीय पक्ष, विविध सामाजिक, शैक्षणिक, कर्मचारी आणि धार्मिक संघटनांसह, अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयांसह ठिकठिकाणी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सकाळी सामाजिक न्याय भवन येथून ‘संविधान गौरव रॅली’ काढण्यात आली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल स्टुडन्ट फेडरेशन, संविधान फाऊंडेशनसह विविध संघटनांतर्फे ‘दीक्षाभूमी ते संविधान चौक’ असा वॉक फॉर संविधान हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. याशिवाय सर्वच राजकीय पक्षांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, कर्मचारी संघटनांनी संविधान चौक येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून अभिवादन केले. याशिवाय शहरात विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बौद्ध विहारांमध्येही संविधान दिन साजरा करण्यात आला.विविधतेतील एकतेचा परिचय भारतात विविधता आहे. जात, धर्म, भाषा, प्रांत आदींची विविधता असूनही हा देश एकजूट आहे, त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय संविधान होय. या संविधानामुळेच भारताला विविधतेतील एकता असलेला देश असे म्हटले जाते. संविधान दिनानिमित्त याचा प्रत्यय दिसून आला. शहरातील विविध भागातून निघालेल्या रॅलींचा समारोप संविधान चौकात झाल्याने संविधान चौक गजबजून गेला होता. या रॅलींमध्ये सर्वच धर्मांचे समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी उच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य तैलचित्राला न्यायमूर्तींच्या हस्ते मालार्पण करण्यात आले. यानंतर उच्च न्यायालयातील संविधान प्रस्तावनेजवळ येऊन न्यायमर्तींनी आदरांजली व्यक्त केली. याप्रसंगी वरिष्ठ प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, न्या. सुनील शुक्रे, न्या. विनय देशपांडे, न्या. प्रदीप देशमुख, न्या. स्वप्ना जोशी, न्या. नितीन सांबरे, न्या. रोहित देव , न्या. मनीष पितळे, न्या. मुरलीधर गिरटकर, न्या. श्रीराम मोडक, न्या. अरुण उपाध्ये, न्या. विनय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, मुख्य सरकारी वकील सुमंत देवपुजारी, सहायक सॉलिसिटर जनरल अॅड. उल्हास औरंगाबादकर, हायकोर्टाचे रजिस्ट्रार कुळकर्णी, अॅड. शैलेष नारनवरे यांच्यासह इतरही वकील मंडळी उपस्थित होती.नक्षलविरोधी अभियानसंविधान दिनानिमित्त नक्षलविरोधी अभियान नागपूरतर्फे अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.यावेळी शेलार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच मुंबई येथील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी, कर्मचारी व मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमात विशेष कृती दलाचे पोलीस उपअधीक्षक विजय पळसुले, सीआयएटीचे उपसमादेशक धनराज कोसे, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, मंगेश शेलोटकर, सहायक पोलीस निरीक्षक संजय पिसे, प्रभारी सहायक संचालक हंसराज राऊत, स्वीय सहायक मारोती जुनघरे, एस.ए.मेश्राम, कार्यालय अधीक्षक परवीन हुसैन यांच्यासह नक्षलविरोधी अभियान, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, विशेष कृती दल, सीआयएटी येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बहुजन समाज पार्टी संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीतर्फे सोमवारी सकाळी बसपा कार्यालय सम्यकनगर, कांशीराम मार्ग (नारी रोड) येथून स्कूटर रॅली काढण्यात आली. ही रॅली शहराच्या मुख्य मार्गाने फिरून संविधान चौकात पोहोचली. बाबासाहेबांच्या पुतळ्याला मालार्पण करून रॅलीचा समारोप झाला.रॅलीत बसपा प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, प्रदेश अध्यक्ष सुरेश साखरे, अॅड. संदीप ताजने, कृष्णा बेले, प्रदेश महासचिव पृथ्वीराज शेंडे, प्रदेश सचिव उत्तम शेवडे, भाऊ गोंडाणे, रूपेश बागेश्वर, नागोराव जयकर आदी उपस्थित होते.रॅलीचे नेतृत्व बसपाचे शहराध्यक्ष प्रकाश गजभिये, जिल्हाध्यक्ष विलास सोमकुवर, प्रभारी योगेश लांजेवार, वर्षा वाघमारे, सोनिया रामटेके यांनी केले.संविधान चौकात पाणी पाऊच वितरणआॅरेंज अॅण्ड कॉटन इंडियन रिअॅलिटीजतर्फे संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर येथे येणाऱ्या नागरिकांना पाणी पाऊच वितरित केले. यात भूपेश वाघमारे, सचिन अंबादे, जितू ओके आदींचा सहभाग होता.राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिकाविश्वकर्मानगर, चंद्रमणीनगर, कुकडे -ले-आऊट येथील राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिकेच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला. भंते धम्म सारथी अध्यक्षस्थानी होते. अनिकेत कुत्तरमरे, तथागत बुद्ध विहाराचे अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ कांबळे, दशरथ शंभरकर, जिजा नगरारे, सुबोध नगरारे,संगम दातार, पुनवटकर, रजत पाल, प्रशांत धाकडे, प्रमुख अतिथी होते. यावेळी संविधानावर प्रकाश टाकण्यात आला तसेच संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संचालन अमित जांभुळकर यांनी केले. मनीष शंभरकर यांनी आभार मानले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीपरमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेनातर्फे दीक्षाभूमी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करण्यात आले.यावेळी सदस्य एन.आर. सुटे, सुधीर फुलझेले, प्राचार्य पवार, भंते नागघोष, भंते धम्मविजय, भंते भीमाबोधी, भंते धम्मप्रकाश, भंते महानाग, भंते धम्मबोधी, भंते नागसेन, भंते कश्यप, भंते शीलानंद, रवी मेंढे, राहुल कराडे आदी उपस्थित होते.पीपल्स रिपब्लिकन पार्टीपीपल्स रिपब्लिकन पार्टी नागपूर शहरतर्फे संविधान दिनानिमित्त संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळूमामा कोसमकर, भगवानदास भोजवानी, कैलास बोंबले, प्रकाश मेश्राम, कुंदन उके, गौतम गेडाम, प्रभाकर बागडे, विनोद पाटील, गौतम थुलकर, भीमराव कळमकर, रामभाऊ इंगोले, तानाजी खापडे, आशिष डोंगरे, अॅन्थोनी टेंभेकर, राहुल अंबादे, पंकज रामटेके, नरेश रक्षक, सुनील कांबळे आदी उपस्थित होते.नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी नापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी दक्षिण नागपूरतर्फे अध्यक्ष दिनेश तराळे यांच्या हस्ते बाबुळखेडा येथील त्रिशरण चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक किशोर गजभिये, शहर काँग्रेसचे महासचिव सुनील पाटील, किशोर गाढवे, वसंता लुटे, प्रेमराज जिचकार, जितलाल शाहू, प्रवीण सांदेकर, मामा राऊत, गोपाल हातागडे, सुभाष पेंढारकर, नरेश खडसे, भीमराव तेलंग, राजेश कांबळे, मधुकर चौधरी, देवेंद्र नागपुरे, भागवत सोमकुवंर, मुकुंदा दुधमोगरे, रामगोविंद खोब्रागडे, देवेश गायधने, भाऊराव कोकणे आदी उपस्थित होते.शहर काँग्रेस कमिटीतर्फे मध्य नागपुरातही संविधान साजरा करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक सोशल फोरमचे सचिव हफीज खॉ पठान, ब्लॉक १७ चे अध्यक्ष अब्दुल शकील, शहर उपाध्यक्ष दिनेश बानाबाकोडे, अजय शिवणकर, प्रदीप पोहाणे, आशिष नेवले, सुनील दहिकर, स्नेहल दहीकर उपस्थित होते.
महाराष्ट्र आॅफीसर्स फोरम महाराष्ट्र आॅफीसर्स फोरमतर्फे संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष इ.झेड. खोबागडे, शिवदास वासे, राजरतन कुंभारे, पी.आर. पुडके, मिलिंद बन्सोड, टी.बी. देवतळे, रेखा खोब्रागडे, डॉ. जयराम खोब्रागडे, तहसीलदार धाबर्डे, दीपक निरंजन, दक्षायण सोनवणे, वसंत वाळके, दिगंबर गोंडाणे, सच्चिदानंद दारुंडे, सिद्धार्थ हस्ते आदी उपस्थित होते.
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशासनिक अधिकारी देवेंद्र वानखेडे, दिलीप वालदे, प्रकाश नितनवरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण रून आदरांजली अर्पण केली. तसेच प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी रजकुमार गिरडकर, किशोर देशमुख, रजेश वैद्य, मिलिंद घारमाडे, अशफाक हुसेन, सुरेश कामडी, मिलिंद बावसे, रमण शेळके, अनंता उईके, आदी उपस्थित होते.