मनसेचे प्रशांत पवार यांचा पुढाकार : घरोघरी जाऊन केले रोपाचे दान नागपूर : मैत्री दिनाचे औचित्य साधून मनसे पश्चिम विभागातर्फे वृक्षारोपणाचा संदेश देण्यात आला. उपशहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी पदयात्रा काढून, घरोघरी जाऊन नागरिकांना वृक्षाच्या रोपाचे दान केले. या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्याचा व युवकांना नवीन प्रकारे मैत्री दिन साजरा करण्याचा त्यांनी संदेश दिला. काटोल रोडवरील नर्मदा कॉलनी, वेलकम नगर, गुलशन कॉलनी, वीरचक्र कॉलनी या भागात ही पदयात्रा काढण्यात आली. यावेळी एस.एन.डी.एल.तर्फे पाठविण्यात येणाऱ्या वीज बिलाच्या तक्रारी नागरिकांतर्फे प्रशांत पवार यांना सांगण्यात आल्या. त्यावर मनसे निश्चित कारवाई क रेल असे आश्वासन नागरिकांना देण्यात आले. येत्या ६ आॅगस्ट रोजी मनसे एस.एन.डी.एल. विरोधात महामोर्चा काढून या सर्व तक्रारींवर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आज पावले उचलण्याची गरज असून, त्याची विधायक उपक्रमाच्या माध्यमातून ही सुरुवात करण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पदयात्रेत विभाग अध्यक्ष चंदू लाडे, उपविभाग अध्यक्ष विश्वनाथ देशमुख, प्रमोद वैद्य, मनोज अग्निहोत्री, रवी वऱ्हाडे, दादू घोडमारे, पंकज इरखेडे, सौरभ नाईक, पंकज निंबाळकर, शैलेश देशमुख, श्रीराम धोपडे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
मैत्री दिनी वृक्षारोपणाचा जागर
By admin | Published: August 04, 2014 12:54 AM