-अटकेतील आरोपींची संख्या आठ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - जय श्रीराम अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी गणेशनगर या संस्थेतील कोट्यवधीच्या घोटाळ्यातील आरोपी विजय माधवराव चिकटे (वय ४९, रा. अनमोलनगर वाठोडा) याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या बांधल्या.
गुन्हे शाखा अनेक दिवसापासून हा तपास करीत असून, याप्रकरणी आतापावेेतो सोसायटीचे अध्यक्ष खेमचंद सीतारामजी मेहरकुरे, अर्चना गोपाल टेके, योगेश मनोहर चरडे, अभिषेक खेमचंद मेहरकुरे, अंकुश अनिल कावरे, अशोक बालाजी दुरबुडे तसेच सुनीता केशव पळ या आरोपींना अटक केली आहे. हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात आणखी एक आरोपी विजय चिकटे याच्या २० फेब्रुवारीला पोलिसांनी मुसक्या बांधल्या. त्याला न्यायालयात हजर करून त्याचा सहा दिवसाचा पीसीआर मिळविला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
----
पीडितांना आवाहन
या प्रकरणात आरोपींविषयी आणि या घोटाळ्याविषयी काही माहिती अथवा तक्रार द्यायची असल्यास गुन्हे शाखेच्या प्रशासकीय इमारतीत संपर्क करावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
----