नागपूर : दिल्लीवरून रायपूरला जाणाऱ्या केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या चार्टर्ड विमानाला दृश्यतेच्या कारणामुळे विमानतळ वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (एटीएस) परवानगी न मिळाल्यामुळे सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक उतरवावे लागले. जेटली ३० मिनिटे विमानतळावरील विशेष कक्षात थांबले होते. रायपूर येथे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तेथील विमानतळावर दृश्यता कमी होती. खराब हवामानाचा जेटली यांना फटका बसला. एटीएसकडून परवानगी मिळाल्यानंतर विमानाने दुपारी १२ला रायपूरकडे उड्डाण भरले. (प्रतिनिधी)
जेटली यांना खराब हवामानाचा फटका
By admin | Published: July 05, 2016 2:48 AM