शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

नागपुरातील जामठा स्टेडियम भारतासाठी नेहमीच ‘लकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 10:23 AM

विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा स्टेडियम भारतासाठी नेहमी ‘लकी’ ठरले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ क्रिकेट संघटनेचे जामठा स्टेडियम भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नेहमी ‘लकी’ ठरले. उभय संघांमध्ये आतापर्यंत येथे तीन एकदिवसीय खेळले गेले. तिन्ही सामन्यात यजमान संघाने बाजी मारली आहे. भारताने येथे पहिला सामना २८ ऑक्टोबर २००९ रोजी खेळला. नव्या मैदानावर हा पहिलाच सामना होता. तेव्हा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने १०७ चेंडूत १२४ धावा ठोकल्या होत्या व या जोरावर हा सामना भारताने ९९ धावांनी जिंकला होता. धोनीच्या खेळीच्या बळावर भारताने ७ बाद ३५४ धावा उभारल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला २५५ धावांत लोळविले होते.उभय संघांमध्ये दुसरा सामना ३० आॅक्टोबर २०१३ रोजी खेळविण्यात आला. ऑस्ट्रेलियाने ६ बाद ३५० धावा केल्यानंतरही भारताने हा सामना ६ गडी राखून जिंकला. तत्कालीन कर्णधार जॉर्ज बेली(१५६) व शेन वॉटसन (१०२) यांच्या तडाख्यामुळे पाहुण्यांनी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर शिखर धवन (१००) व विराट कोहली (नाबाद ११५) यांच्यामुळे भारताने सहजपणे बाजी मारली होता.दोन्ही संघ १ ऑक्टोबर २०१७ रोजी तिसऱ्यांदा येथे पुरस्परांपुढे आले. भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करीत ९ बाद २४२ धावा केल्या. रोहित शर्माच्या १२५ व अजिंक्य रहाणेच्या ६१ धावांच्या जोरावर भारताने ४२.५ षटकात विजयी लक्ष्य गाठले होते. २०११ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने येथे न्यूझीलंडला २५ फेब्रुवारी २०११ रोजी ७ गडी राखून पराभूत केले होते.

लक्षवेधी...व्हीसीएच्या जामठा मैदानावर महेंद्रसिंग धोनी हा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज आहे. त्याने येथे चार डावात दोन शतकांसह २६८ धावा ठोकल्या. त्यापैकी एक शतक २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध साजरे केले होते.विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी, वन डे अािण टी-२० अशा १५८ डावात ८९७८ धावा केल्या. नागपुरात त्याने ४४ धावा केल्यास कर्णधार म्हणून नऊ हजार धावा ठोकणारा तो पहिला खेळाडू बनेल. जामठा येथे हा विक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :India vs Australiaभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया