लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नऊ वर्षांची जन्मजात अंध असलेली आस्था ही जुन्या वर्षांचेच नव्हे तर येणाऱ्या वर्षांमध्ये कोणत्या तारखेला कोणता दिवस येतो, हे अचूकपणे सांगते. म्हणूच तिला ‘ह्युमन कॅलेंडर’ म्हणजे मानवी दिनदर्शिका असेही संबोधिले जाते. आस्थाला जगातील सर्व देशाच्या राजधान्यांची नावे तोंडपाठ आहेत. एवढेच नाहीतर मोठमोठे गणितही काही मिनिटातच ती सोडविते. हे आश्चर्यकारक असले तरी, हा एक ‘सिंड्रोम’ आहे, अशी माहिती जागतिक ट्रॉपीकल न्यूरोलॉजिचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.डॉ. मेश्राम म्हणाले, अनन्य साधारण मेंदूच्या या क्षमतेला वैद्यकीय भाषेत ‘सावंत सिंड्रोम’ म्हटले जाते. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘किम पीक’. ‘रेन मॅन’ हा चित्रपट त्यांच्यावर आधारित आहे. जगात या ‘सिंड्रोम’चे मोजकेच लोक आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. ‘सावंत सिंड्रोम’ हा जन्मापासून असू शकतो, किंवा मेंदूच्या आजारामुळे किंवा मेंदूला मार लागल्यामुळेही होऊ शकतो. संगीत, गणित, स्मरणशक्ती आणि चित्रकलेत अशा व्यक्तींमध्ये याची विशेष अभिरुची असते. यातील ५० टक्के लोकांना ‘ऑटिझम’सुद्धा असतो, असेही ते म्हणाले. आज साधणार संवाद‘नॅशनल ब्रेन विक’च्या निमित्ताने डॉ. चंद्रशेखर मेश्राम अशा अनेक ‘सिंड्रोम’वर रविवार २२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता कवी कुलगुरू कालिदास सभागृह, गायत्री नगर आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड येथे मार्गदर्शन करतील. सोबतच डॉ. श्याम बाभुळकर हे रस्ते अपघातात ‘हेड इन्जुरी’, डॉ. लोकेंद्र सिंग हे ‘मेंदूचे आरोग्य कसे राखावे’ व डॉ. सुधीर भावे हे ‘इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ब्रेन’ या विषयावर मार्गदर्शन करतील.‘जर समजून घ्या’ नाटकयाच सभागृहामध्ये ज्येष्ठ अभिनेते व मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक ‘जर समजून घ्या’ सादर केले जाईल. मराठी अभिनेत्री मंजुषा घोळसे यांचाही सहभाग असणार आहे. नाटकानंतर डॉ. आगाशे श्रोत्यांशी संवाद साधतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मेश्राम यांच्या पुढाकारात नागपूर न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी क्लचरल फाऊंडेशन, नागपूर महानगरपालिका, नागपूर सायकॅट्रीक सोसायटी नागपूर, सप्तक डॉ. आंबेडकर कॉलेज स्पोर्ट्स अकादमी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने करण्यात आले आहे.
Jara hatke : दृष्टीहीन मुलगी बनली 'ह्युमन कॅलेंडर '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:00 AM
नऊ वर्षांची जन्मजात अंध असलेली आस्था ही जुन्या वर्षांचेच नव्हे तर येणाऱ्या वर्षांमध्ये कोणत्या तारखेला कोणता दिवस येतो, हे अचूकपणे सांगते. म्हणूच तिला ‘ह्युमन कॅलेंडर’ म्हणजे मानवी दिनदर्शिका असेही संबोधिले जाते.
ठळक मुद्देमेंदूचे अनन्यसाधारण कार्य एक ‘सिंड्रोम’ : चंद्रशेखर मेश्राम यांची माहिती