- प्रफुल्ल शिलेदार यांनी जागविल्या आठवणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जयंत पवार यांनी आयुष्याची ३० वर्षे प्रायोगिक नाटकाच्या समीक्षेकरिता समर्पित केली. समीक्षण हे थेट नाटक बघूनच करायचे, यावरच त्यांचा विश्वास होता. ते नाटककराच्या पलीकडले व्यक्तिमत्त्व होते, अशा भावना प्रसिद्ध कवी प्रफुल्ल शिलेदार यांनी जयंत पवारांच्या आठवणी सांगताना व्यक्त केल्या.
राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्थेच्या वतीने जयंत पवार यांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रभाषा भवन येथे त्यांच्या नाटकांतील दृश्यांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ‘अधांतर’ या नाटकातील सादरीकरणाचे दिग्दर्शन सचिन बुरे यांनी केले. यात आकांक्षा, दर्शना, वैभव, मनिष, राज, प्रशांत, शुभम, आकाश या कलावंतांनी सहभाग घेतला. त्यानंतर नाटककार पराग घोंगे व प्रफुल्ल शिलेदार यांनी आपले अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अर्पित सर्वे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजाराम शुक्ल व सचिव बाबूजी अग्रवाल उपस्थित होते.
.......