नागपूर : अमृत प्रतिष्ठानच्या वतीने संगीत कलानिधी पं. विष्णू नारायण भातखंडे, पद्मभूषण डॉ. श्रीकृष्ण नारायण रातंजनकर व संगीताचार्य पं. अमृतराव निस्ताने या त्रिमूर्तींचा जयंती महोत्सव व प्रतिष्ठानचा २३ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन सुरमणी पं. वाल्मिक धांदे, संतूरवादक मोहन निस्ताने, गायक संगीतकार मोरेश्वर निस्ताने यांच्या हस्ते करण्यात आले. संगीत सभेची सुरुवात मेघना निस्ताने व वृंदा तारे यांच्या सरस्वती वंदनेने करण्यात आली. प्रास्ताविक श्रद्धा भारद्वाज यांनी केले. त्यानंतर अथर्व नवसाळकर, श्रेयस नवसाळकर यांनी संतूरवादन केले. त्यांना तबल्यावर अमोल उरकुडे यांनी साथसंगत दिली. यावेळी जयश्री चाणेकर हणवंते यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना संवादिनीवर श्रुती पांडवकर तर तबल्यावर अमोल उरकुडे यांनी संगत केली. तद्नंतर शास्त्रीय गायिका अंकिता टकले, श्रुती पांडवकर व मोरेश्वर निस्ताने यांचे गायन झाले. त्यांना तबल्यावर अमोल यांच्यासह आशिष तळवेकर यांनी संगत केली. आभार मोहन निस्ताने यांनी मानले.
....