लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जेट एअरवेजचे बुधवारी नागपूर-दिल्ली-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गुरुवारी या मार्गावर कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागला.नागपूर येथील एका प्रवाशाला दिल्लीत अनेक तास थांबावे लागले. त्यांनी सांगितले की, कंपनीने विमान गुरुवारी रद्द केल्यामुळे विमानतळावर विचारपूस करण्यास आलेल्या अनेकांना निराश होऊन परतावे लागले. ऑपरेशन कारणांनी उड्डाण रद्द करण्यात आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. याच कारणांमुळे संपूर्ण मार्च महिन्यात उड्डाणे बंद राहणार आहे. यामध्ये सकाळ आणि दुपारच्या दिल्ली विमानाव्यतिरिक्त रात्री ९.२० वाजता उड्डाण भरणारे ९डब्ल्यू २८६५ मुंबई-नागपूर विमान रद्द राहील.कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, विमानात लोड फॅक्टरचे कारण नाही. पण परीक्षा आणि वित्तीय वर्षाचा अखेरचा महिना असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येवर आंशिक परिणाम होते. पण व्यावसायिक आणि अन्य प्रवाशांच्या ये-जा यावर काहीही परिणाम होत नाही. सध्या कंपनी संकटात आहे. मार्चमध्ये बंद राहणारी विमानसेवा भविष्यात सुरू होईल.पाच विमानांना विलंबदेशाच्या विभिन्न शहरातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या पाच विमानांना बुधवारी ३० मिनिटे ते ३.४५ तासांपर्यंत उशीर झाला. ६ई५०९ बेंगळुरू-नागपूर विमान १.१२ तास उशिरा अर्थात सकाळी ७.४५ ऐवजी ८.५७ वाजता पोहोचले. ६ई ३८२ इंदूर-नागपूर जवळपास ३.४५ तास उशिरा अर्थात सायंकाळी ६.३० ऐवजी रात्री ९.१५ वाजता आले. पुणे-नागपूर विमान ४० मिनिटे उशिरा ८ वाजता पोहोचले. याशिवाय नागपुरातून अन्य शहरात जाणाऱ्या ६ई३१४ नागपूर-चेन्नई विमानाने १.४७ मिनिटे उशिरा अर्थात ५.३७ वाजता उड्डाण भरले. तर ६ई२०२ नागपूर-दिल्ली ४० मिनिटे उशिरा अर्थात सायंकाळी ७.५० ऐवजी रात्री ८.३० वाजता रवाना झाले.
जेट एअरवेजचे नागपूर-दिल्ली-नागपूर उड्डाण रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:04 AM
जेट एअरवेजचे बुधवारी नागपूर-दिल्ली-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गुरुवारी या मार्गावर कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागला.
ठळक मुद्देसंपूर्ण मार्च महिन्यात बंद राहणार तीन उड्डाणे