काटाेल : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना काटाेल शहरातील गुप्ता ले-आऊट येथे शनिवारी (दि.१९) सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
नंदकिशाेर भागवतराव खसारे (४८, रा. गुप्ता ले-आऊट, काटाेल) यांच्या घराचे दार उघडून अज्ञात चाेरट्याने आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील भिंतीला लटकलेल्या पर्समधील तीन ग्रॅम साेन्याची पाेत किंमत नऊ हजार रुपये आणि राेख ७,००० रुपये असा एकूण १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, ही बाब लक्षात येताच खसारे यांनी काटाेल पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी काटाेल पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि कलम ४५७, ३८०, ५११ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा पुढील तपास पाेलीस नाईक संताेष आंधळे करीत आहेत.