उमरेड : भाजीपाला खरेदी करताना महिलेच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावणारी चाेर महिला पाेलिसांच्या जाळ्यात अकडली. तिला अटक करण्यात आली असून, तिच्याकडून ७५ हजार रुपयांची साेनसाखळी जप्त केल्याची माहिती ठाणेदार यशवंत साेलसे यांनी दिली. ही घटना साेमवारी (दि. ८) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास उमरेड शहरातील भाजीबाजारात घडली.
अटकेतील चाेर महिला ५० वर्षीय असून, मेडिकल चाैक, झाेपडपट्टी, नागपूर येथील रहिवासी आहे. पुष्पा किशोर जिसनानी या भाजीपाला खरेदी करीत हाेत्या. त्याच वेळी गर्दीचा फायदा घेत, चाेर महिलेने त्यांच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावून घेतली. ही बाब लक्षात येताच, पुष्पा जिसवानी यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बाजारातील नागरिकांनी त्या महिलेस पकडले व पाेलिसांना सूचना दिली. पाेलिसांनी घटनास्थळ गाठून महिलेस ताब्यात घेतले. सुरुवातीला नकार देणाऱ्या त्या महिलेने शेवटी गुन्ह्याची कबुली दिली. त्यातच पाेलिसांनी तिच्याकडून साेनसाखळी जप्त केली. त्या १५ ग्रॅमच्या साेनसाखळीची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे ठाणेदार यशवंत साेलसे यांनी सांगितले. या प्रकरणी उमरेड पाेलिसांनी भादंवि ३९२ अन्वये गुन्हा नाेंदवून तिला अटक केली. तिच्याकडून चाेरीच्या अन्य घटना उघड हाेण्याची शक्यताही पाेलिसांनी व्यक्त केली.