नागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीच्या पर्वावर ‘जिजाऊ गीतगायन’ या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन झाले. अमरावतील येथील नादब्रह्मच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुबेर वैभवी लखुजी कुळी, धन्य मातृतीर्थ, रणांगणात झुंजण्या माता जिजाऊ पुढे, शिवरायी कृपे जन्मले बाळ, शिवपिंडीवर अभिषेक करी, सुवर्ण सिंहासनी बैठक शिवभूपती आदी सुरेल गीतांचे सादरीकरण गायकांनी केले. धन्य धन्य वीर मराठी... या पोवाड्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. पं. डॉ. भोजराज चौधरी, गझलरत्न डॉ. राजेश उमाळे, राहुल तायडे, प्रणिता वाकोडे यांनी गीत सादर केले. त्यांना तबल्यावर शीतल मांडवगडे, ऑर्गनवर रामेश्वर काळे, ढोलकवर आकाश थोरात, साईड रिदमवर विरेंद्र गावंडे यांनी साथसंगत केलि. संगीत संयोजन कैलाश नेरकर यांचे होते. संकल्पना व निर्मिती केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सतीश पावडे यांची होती. निवेदन क्षीप्रा मानकर यांनी केले.
.........