लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.होशियारसिंग असे तक्रारकर्त्याचे नाव असून, ते गार्डस् रेजिमेंटल सेंटरमध्ये कार्यरत आहेत. होशियारसिंग यांनी यादव यांच्या मौजा घोरपड येथील ले-आऊटमधील एक भूखंड ७ लाख ५० हजार रुपयात खरेदी केला होता. त्या भूखंडाचे सहा महिन्यात विक्रीपत्र करण्याचे ठरले होते. होशियारसिंग यांनी यादव यांना धनादेशाद्वारे ७ लाख ५० हजार रुपये दिले. दरम्यान, यादव हे निर्धारित वेळेत भूखंडाचे विक्रीपत्र करून देऊ शकले नाही. परिणामी, त्यांनी संबंधित रक्कम व्याजासह परत करण्यासाठी होशियारसिंग यांना सुरुवातीला ६ लाख ५० हजार रुपयाचे दोन धनादेश दिले. ते धनादेश बँक खात्यात कमी रक्कम असल्यामुळे १९ फेब्रुवारी व १२ सप्टेंबर २०१७ रोजी अनादरित झाले. त्यानंतर होशियारसिंग यांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून यादव यांच्याविरुद्ध जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. होशियारसिंग यांच्यातर्फे अॅड. एच. आय. कोठारी यांनी कामकाज पाहिले.
जेएमएफसी : भूविकासकाला सहा महिने कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:31 AM
कामठी येथील विशेष प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने धनादेश अनादर प्रकरणात मुरलीकृष्णा लॅन्ड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर अमरदेव यादव यांना सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, तक्रारकर्त्यास एक महिन्यामध्ये ६ लाख ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी असा आदेश दिला व भरपाई न दिल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे स्पष्ट केले.
ठळक मुद्देधनादेश अनादराचे प्रकरण