नागपूर : जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीत झालेली देशविरोधी नारेबाजी ‘नक्षल कनेक्टेड’ असल्याची चर्चा सुरू झाल्याने तपास यंत्रणांमधील हालचाली तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेला माओवाद्यांचा कथित ‘थिंक टँक’ प्रो. जी. एन. साईबाबा याच्याकडेही तपास यंत्रणांची नजर वळली आहे. यासंबंधाने दिल्ली विद्यापीठ तसेच जेएनयूतील विद्यार्थी संघटना आणि प्रो. साईबाबाच्या सलगीचे जुने संदर्भ तपासले जात आहे. दिल्ली विद्यापीठाचा प्रो. साईबाबा याला गडचिरोली पोलिसांनी दीड वर्षांपूर्वी अटक केली होती. साईबाबा डीएसयूशी कनेक्टयासंदर्भात नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्याशी संपर्क केला असता चार्जशिट दाखल झाल्यानंतरच्या तपासात साईबाबा आणि डेमोकॅ्रटिक स्टुडंट युनियनचे (डीएसयू) कनेक्शन उघड झाले होते, असे कदम यांनी सांगितले. साईबाबा डीएसयूच्या पार्टी सेलला मार्गदर्शन करायचा. त्याने दिल्लीतील विद्यार्थी संघटनांची भली मोठी फळी तयार केली होती. काहींची चौकशीही झाली होती. दरम्यान, काश्मीर किंवा उत्तरेतील काही विद्यार्थी संघटनांची फुटिरतावादी विचारधारा लक्षात घेता या प्रकरणाचा नक्षल संबंध असू शकतो, असा अंदाजही कदम यांनी व्यक्त केला.
जेएनयूचे नागपूर कनेक्शन
By admin | Published: February 17, 2016 3:00 AM