शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

‘जेएनयू’बाबत संघ परिवार होणार आक्रमक

By admin | Published: February 24, 2016 3:31 AM

देशाच्या राजधानीतील ‘जेएनयू’मधील (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) वादासंदर्भात संघ परिवार विरुद्ध डावे पक्ष-कॉंग्रेस आमनेसामने उभे ठाकले आहे.

युवा जागरण समितीतर्फे विशेष सभेचे आयोजन : अनुपम खेर, हनुमंतप्पा कुटुंबीयांची उपस्थितीनागपूर : देशाच्या राजधानीतील ‘जेएनयू’मधील (जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी) वादासंदर्भात संघ परिवार विरुद्ध डावे पक्ष-कॉंग्रेस आमनेसामने उभे ठाकले आहे. या मुद्यावरून देशाचे राजकारण तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने थेट निषेध केला असून आता देशपातळीवर या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. संघभूमीतूनच याची सुरुवात होणार असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून विशेष सभेचे गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी नागपूरात आयोजन करण्यात आले आहे. ‘अभाविप’च्या ‘बॅनर’खाली हे आयोजन न करता युवा जागरण समितीच्या नावाखाली ही सभा बोलविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात असहिष्णुतेच्या मुद्यावरून मोदी सरकारच्या समर्थनार्थ उतरलेले अनुपम खेर तसेच शहीद लान्स नायक हनुमंतप्पा यांचे कुटुंबीय सहभागी होण्याची शक्यता आहे.सीताबर्डी येथील सेवासदन हायस्कूलच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या जमिनीवरून राष्ट्रविघातक शक्तींना स्पष्टपणे संदेश देण्यात येईल, असे युवा जागरण समितीतर्फे सांगण्यात येत आहे व याच शब्दांत या सभेचा प्रचार करण्यात येत आहे. या सभेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर हे भाषण करणार आहेत. नागपूरच्या भूमीवरुन या प्रकरणात आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळाचे या सभेकडे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)