शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

नागपूरच्या कस्तूरचंद पार्कवर जॉगिंग, वॉकिंग व सायकल ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 10:56 AM

राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेतर्फे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तूरचंद पार्कवर साकारण्यात येणाऱ्या जॉगिंग, वॉकिंग आणि सायकल ट्रॅकचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाच्या निधीतून महापालिकेतर्फे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कस्तूरचंद पार्कवर साकारण्यात येणाऱ्या जॉगिंग, वॉकिंग आणि सायकल ट्रॅकचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महापौर नंदा जिचकार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी आमदार सुधाकर देशमुख, महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष वीरद्र कुकरेजा, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, कर आकारणी समितीचे सभापती संदीप जाधव, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, किशोर जिचकार, स्नेहा निकोसे, ममता सहारे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे, शहर अभियंता मनोज तालेवार, सोलर इंडस्ट्रीज इंडिया लि.चे व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल, उपाध्यक्ष जे. एफ. सालवे उपस्थित होते.कस्तूरचंद पार्कच्या सौंदर्यीकरणा अंतर्गत तेथे नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक साकारण्यात येत आहे. सभोवताल वृक्षलागवड करण्यात येणार आहे तर पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल, असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे. सेल्फी पॉर्इंट सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनी साकारणार असून अन्य सौंदर्यीकरणाचा प्रकल्प ११ कोटींचा आहे.राज्य शासनाने पाच कोटींचा निधी मंजूर केला आहे. या सौंदर्यीकरणासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विविध आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना सादर केल्या होत्या. त्यात आयडियाज आर्कि टेक्चर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली संकल्पना निवडण्यात आली.यावेळी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे व नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वास्तुविशारद अशोक मोखा यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. पाहुण्यांचे स्वागत सोलर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक मनीष नुवाल यांनी तर संचालन व आभार प्रदर्शन महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

असा आहे सौंदर्यीकरण प्रकल्पकस्तूरचंद पार्क सौंदर्यीकरण प्रकल्पात जॉगिंग, वॉकिंग, सायकल ट्रॅकसह संपूर्ण हेरिटेज स्ट्रक्चरला स्टील रेलिंगचे कम्पाऊंड, सर्वात उंच ध्वज, नवीन प्रवेशद्वार, ट्रॅकच्या दोन्ही बाजूंनी वृक्ष, संपूर्ण ट्रॅकवर लाईट, हेरिटेज स्ट्रक्चरवर रोषणाई, उत्तर आणि दक्षिण बाजूंनी प्रसाधनगृह, रेनवॉटर हार्वेस्टिंग, मेट्रोच्या भिंतीवर एलईडी स्क्रीन, कारंजे, वाहनतळ, बसण्यासाठी बेंच, लहान मुलांसाठी खेळण्याचा एरिया, अशोक स्तंभ, ‘आय लव्ह नागपूर’ असे लिहिलेला सेल्फी पॉईंट, उत्तर आणि दक्षिण दिशेला सुरक्षा रक्षक खोली आदी कामांचा समावेश आहे.

टॅग्स :Kasturchand Parkकस्तूरचंद पार्क