लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयीसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांनी इंदोरा चौकातील आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’ चित्रपट बघण्याचा आनंद लुटला.शहर फूटपाथवरील बेघर, निराधारांना निवाऱ्याची चांगली सोय उपलब्ध व्हावी. त्यांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गत नागपूर महापालिका, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून शहरी बेघरांसाठी बेघर निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनात शहराच्या फूटपाथवरील बेघरांना निवारा देण्याचे कार्य सुरू आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत सर्व शहरी बेघर निवारातील बेघरांना आयनॉक्स जसवंत तुली मॉल इंदोरा येथे गल्ली बॉय हा चित्रपट दाखवण्यात आला.बेघर असतानाही मल्टीप्लेक्समध्ये चित्रपट बघण्याचा आनंद अनुभवता आल्याने त्यांच्या उत्साहाचे वातावरण होते. ‘अपना टाइम आएगा’ या चित्रपटातील गाण्याचे फलक झळकावत या बेघर लोकांनो आयुष्यात हताश होऊ नका. आनंदाने जगा असा मंत्र दिला. याप्रसंगी बेघरांसह दीनदयाल अंत्योदय योजना-नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक प्रमोद खोब्रागडे व निवारागृहाचे कर्मचारीवृंद उपस्थित होते.
बेघरांनी लुटला आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’चा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:47 AM
महापालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्यात आला आहे. बेघर निवाऱ्यातील सोयीसोबतच त्यांच्या मनोजरंजनाचीही काळजी घेण्यात येत आहे. शहर समृद्धी उत्सवांतर्गत बेघर निवाऱ्यातील बेघरांनी इंदोरा चौकातील आयनॉक्समध्ये ‘गल्ली बॉय’ चित्रपट बघण्याचा आनंद लुटला.
ठळक मुद्देशहर समृद्धी उत्सवांतर्गत आयोजन