नागपूरः ग्रामपंचायतीच्य निवडणुकीत शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे प्रतिबिब उमटलेले आहे. भाजपने साडेतीन हजार ग्रामपंचायतीत दावा केला असून शिंदेंच्या शिवसेनेनेही एक हजार ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे, असे दावा करून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विजयाचा जल्लोष विधानभवन परिसरात लाडू वाटून केला.
ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने आघाडी घेतली आहे. या विजयाचा जल्लोष विधानभवन कार्यालयातील भाजपच्या कार्यलयात करण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या निकालामध्ये शिंदे व फडणवीस सरकारच्या कामाची छाप दिसून आली आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या १००० ग्रामपंचायतीच्या निकालापैकी ५१३ ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या आहे. १४० ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेने राखल्या आहे. काँग्रेसची अवस्था अपक्षांपेक्षा वाईट झाली आहे. संपूण्र निकाल येतील तेव्हा ३ हजार ग्रामपंचायती भाजपाच्या असतील तर १ हजार ग्रामपंचायती शिंदेच्या शिवसेनेच्या असतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.