शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
2
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
3
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
4
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
5
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
6
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
7
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
8
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
9
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
10
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
11
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
12
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
13
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
14
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
15
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
20
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...

न्यायाधीशांनी सोशल मीडियापासून दूर राहावे

By admin | Published: March 06, 2017 2:20 AM

न्यायाधीश जबाबदार न्यायिक अधिकारी असतात. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियापासून लांब राहावे अशी सूचना ....

न्या. मंजुला चेल्लुर यांची सूचना : समाजामध्ये निर्माण होऊ शकतो गैरसमजनागपूर : न्यायाधीश जबाबदार न्यायिक अधिकारी असतात. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियापासून लांब राहावे अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती डॉ. मंजुला चेल्लुर यांनी केली. सोशल मीडिया न्यायाधीशांना अडचणीत टाकू शकतो. समाजामध्ये त्यांच्यासंदर्भात गैरसमज पसरवू शकतो अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व मुख्य मध्यस्थी देखरेख समिती (मुंबई उच्च न्यायालय) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी रामदासपेठेतील एका खासगी हॉटेलमध्ये प्रादेशिक परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या मुख्य अतिथी म्हणून बोलत होत्या. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. ‘राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या योजना अंमलात आणण्यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांची भूमिका व पर्यायी वाद निवारण यंत्रणेची प्रभावी अंमलबजावणी’ हा परिषदेचा विषय होता. न्यायव्यवस्था व न्यायाधीश हा न्या. चेल्लुर यांच्या मार्गदर्शनाचा मुख्य धागा होता. आतापर्यंत काही चुकीच्या घटना घडल्या असल्या तरी नागरिक आजही न्यायव्यवस्थेचा सन्मान करतात असे मत त्यांनी व्यक्त केले. न्यायाधीशांचे जीवन संन्यासासारखे असते. त्यांना इतरांसारखे सर्वांसोबत मिळून-मिसळून जगता येत नाही. त्यांना विविध प्रकारच्या मानसिक ताण व समस्यांना तोंड द्यावे लागते. परिणामी न्यायाधीशांमध्ये एकता व कौटुंबिक भावना निर्माण करणे आवश्यक आहे असे यांनी सांगितले. न्याय सर्वांसाठी सारखा असतो. लिंग, भाषा, धर्म व जात न्यायदानाला प्रभावित करू शकत नाही. राष्ट्रीय मुद्दा असो वा स्थानिक आदेशात काहीच बदल होत नाही. न्यायाधीश त्यांच्याकडील प्रकरणांचे सर्वेसर्वा असतात. आपल्यापुढील प्रकरणाचे काय करायचे हे सर्वस्वी न्यायाधीशांच्या हातात असते. त्यांना कोणीही विशिष्ट आदेश करण्यासाठी बाध्य करू शकत नाही. परंतु, प्रकरणात योग्य न्याय करावा एवढी अपेक्षा त्यांच्याकडून असते असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायाधीशांचे वागणे न्यायालयात व न्यायालयाबाहेर सारखेच असले पाहिजे. त्यांच्या वागण्यातून पक्षकारांच्या मनात संशय उपस्थित व्हायला नको. न्यायदान पवित्र कार्य असून त्याची जबाबदारी मिळणे अभिमानाची बाब आहे. स्वत:वर पूर्ण विश्वास व केवळ न्याय करण्याचे लक्ष्य ठेवल्यास नि:संकोचपणे कर्तव्य बजावण्यात अडचण येत नाही असेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)न्यायदान वेळेत व्हावे - न्या. पाटीलन्यायाधीशांनी न्यायदान करताना वक्तशीर असले पाहिजे. न्यायदानातील विलंब पक्षकारांच्या मनात संशय निर्माण करतो. परंतु, गुणवत्तेशी तडजोड करून घाईगडबडीत निर्णय देऊ नये असे मत न्या. नरेश पाटील यांनी व्यक्त केले. न्यायाधीशांनी आत्मसन्मान जपायला हवा. ते नि:पक्षपाती व रागावर नियंत्रण ठेवणारे असावेत. त्यांनी स्वत:चे आरोग्य जपण्यासाठी व्यायाम, खेळणे, संगीत ऐकणे असे छंद जोपासले पाहिजे. मध्यस्थी व लोक न्यायालय या पर्यायी न्यायप्रणालीमुळे प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी झाला आहे. पक्षकारांचा वेळ व खर्च वाचविणारी ही व्यवस्था आहे असे न्या. पाटील यांनी सांगितले.अंतिम घटकाला मिळावा न्याय - न्या. गवईसमाजातील अंतिम घटकाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी न्यायाधीशांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानवाधिकार व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे न्यायाधीशांचे कर्तव्य आहे असे मत न्यायमूर्ती भूषण गवई यांनी व्यक्त केले. महिला, ज्येष्ठ नागरिक, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिक इत्यादी कमकुवत घटकांची राज्यघटनेमध्ये काळजी घेण्यात आली आहे. भारतीय समाजात महिलांना काहीच अधिकार नव्हते. परंतु, राज्यघटनेतील तरतुदींच्या अंमलबजावणीमुळे महिलांनी न्यायालयांसह विविध क्षेत्रात स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे असे त्यांनी सांगितले. देवापेक्षा कठीण कार्य - न्या. धर्माधिकारीपक्षकारांसाठी न्यायाधीश हे देव असतात. परंतु, न्यायाधीशांचे कार्य देवापेक्षा कठीण आहे. देवापुढे केलेली प्रार्थना पूर्ण होण्याचा वेळ नसतो. न्यायाधीशांना मात्र वेळेत न्यायदान करावे लागते असे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी यांनी सांगितले. योग्य न्याय करणे हे न्यायाधीशांचे दायित्व आहे. न्यायाधीशांनी वकिलांना सुनावणीची पूर्ण संधी द्यायला हवी. वकिलांचे काही चुकत असल्यास न्यायाधीशांनी योग्य बाब पुढे ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक निर्णयातून न्यायाधीशांची प्रतिष्ठा वाढायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले.न्यायाधीशांचे गोपनीय मूल्यांकनन्यायदानाचे कर्तव्य योग्य पद्धतीने बजावले जात आहे काय हे पाहण्यासाठी जिल्हा न्यायाधीशांचे गोपनीय मूल्यांकन करण्याचा विचार सुरू असल्याचे न्या. चेल्लुर यांनी सांगितले. अनेक न्यायाधीश प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठविताना पक्षकारांना त्याचे फायदे समजावून सांगत नाहीत. अत्यंत यांत्रिक पद्धतीने प्रकरणे मध्यस्थीसाठी पाठविली जातात. याशिवायही काही बाबी लक्षात घेता न्यायाधीशांचे गोपनीय मूल्यांकन करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती न्या. चेल्लुर यांनी दिली.