शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

दरवळला जुगलबंदीचा ‘स्वरा’गंध

By admin | Published: January 12, 2015 1:04 AM

उपराजधानीच्या कडाक्याच्या थंडीत स्वरांची ऊब. त्यातही जर दोन प्रसिद्ध गायकांची जुगलबंदी असेल आणि त्याला ‘फ्यूजन’ची साथ मिळाली तर क्या कहने ! राहुल देशपांडे अन् स्वप्निल बांदोडकर

वसंतोत्सवाची सांगता : देशपांडे, बांदोडकर जोडगोळीने जिंकले रसिकांचे मननागपूर : उपराजधानीच्या कडाक्याच्या थंडीत स्वरांची ऊब. त्यातही जर दोन प्रसिद्ध गायकांची जुगलबंदी असेल आणि त्याला ‘फ्यूजन’ची साथ मिळाली तर क्या कहने ! राहुल देशपांडे अन् स्वप्निल बांदोडकर यांच्या स्वरांनी डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहातील प्रेक्षक अक्षरश: स्वरसुमनांच्या सुगंधाने मोहित झाले. पहिल्यांदाच मुंबई-पुण्याबाहेर झालेल्या व ‘स्वरवेध’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वसंतोत्सवाची ‘स्वरा’ या बहारदार कार्यक्रमाने रविवारी सायंकाळी सांगता झाली. या संगीत उत्सवामुळे रसिकांना सुखद स्वरानुभवाने नटलेला स्वर‘वसंत’च अनुभवायला मिळाला.‘स्वरा’ची सुरुवात झाली ती ‘पुरिया धनश्री’ रागातील ‘पिया समझाऊ ...समझत नाही..’ या गीतापासून. पारंपरिक रागाने सुरुवात झालेल्या गाण्यात हळूवारपणे ‘फ्यूजन’ सामावले गेले अन् रसिक या संगमात हरवून गेले.‘लागी लगन बैरी संग’ या ‘यमन’ रागातील गाण्यानंतर सादर करण्यात आलेल्या ‘राधाधर मधुमिलिंद जय जय रमा रमण’ या भक्तिरचनेच्या तालाने ‘सौभद्र’ची अनुभूती घेण्याची संधी राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी दिली. त्यानंतर स्वप्निल बांदोडकरने सादर केलेल्या ‘राधा ही बावरी’ या गाण्याला सभागृहाने अक्षरश: डोक्यावर घेतले. या गाण्यादरम्यानच बासरी अन् तबला यांच्या जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. ‘रवि मी हा चंद्र कसा’, ‘घेई छंद मकरंद’, ’अलबेला सजन आयो रे’ या गाण्यात दोघाही गायकांनी अक्षरश: जीव ओतला. कार्यक्रमाच्या अखेरच्या टप्प्यात ‘प्रथम तुला वंदितो’, ‘विठ्ठल नामाचा रे टाहो’ अ़न् ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिगीतांमध्ये सभागृह अक्षरश: तल्लीन झाले होते.या संपूर्ण कार्यक्रमात सचिन बक्षी, अ‍ॅड.भानुदास कुळकर्णी, श्रीकांत पिसे, शिरीष भालेराव, महेंद्र ढोले, अरविंद उपाध्ये आणि नंदू गोहणे यांची सुरेल साथसंगत लाभली. (प्रतिनिधी)