शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

झट् मंगनी...पट् जेल

By admin | Published: March 11, 2016 3:09 AM

‘चट मंगनी, पट् ब्याह’ ही म्हण सुपरिचित आहे. या उलट ‘चट् मंगनी अन् पट जेल’ चा प्रकार ना कुठे घडला, ना कुणी ऐकवला. कळमन्यात मात्र ही घटना घडली.

सडकछाप मजनूची जेलयात्रा : २४ तासात कोर्टात दोषारोपपत्र नरेश डोंगरे नागपूर‘चट मंगनी, पट् ब्याह’ ही म्हण सुपरिचित आहे. या उलट ‘चट् मंगनी अन् पट जेल’ चा प्रकार ना कुठे घडला, ना कुणी ऐकवला. कळमन्यात मात्र ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून आधी मजनूगिरी आणि नंतर भाईगिरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी तातडीने अटकच केली नाही तर त्याला कारागृहात पाठवून या गुन्ह्यासंबंधीचे दोषारोपपत्रही अवघ्या २४ तासात पोलिसांनी कोर्टात सादर केले. महिला-मुलींवरील अत्याचाराच्या गुन्ह्याची प्रकरणे तातडीने मार्गी लागत नसल्याची ओरड असताना कळमना पोलिसांनी हाताळलेले हे प्रकरण ‘मॉडेल’ ठरावे. मंगळवारी देशविदेशात महिला दिनाचा कार्यक्रम धडाक्यात साजरा झाला. याच दिवशी कळमन्यातील गुलमोहर नगरात राहणाऱ्या शाळकरी मुलीशी (वय १५) आरोपी दातऱ्या ऊर्फ पंकज गंगाधर टेकन (वय २०) याने एकतर्फी प्रेमातून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. गेल्या सात दिवसांपासून दातऱ्या मुलीच्या मागे लागला होता. शाळेला जाताना तो तिचा पाठलाग करायचा. फिल्मी स्टाईलमध्ये तिला ‘ए... पलट...!’ म्हणायचा. दोन तीन दिवस त्याचा त्रास सहन केल्यानंतर मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितले. एकदम पोलिसांकडे जाण्याऐवजी त्याला समजावून सांगू‘, अशी भूमिका आईवडिलांनी घेतली अन् त्याच्याकडे दुर्लक्ष केले. दातऱ्या निर्ढावला. भाईगिरीमुळे मुलगी दहशतीतनागपूर : महिला दिनी पीडित मुलगी शाळेतील कार्यक्रम आटोपून घरी परतली अन् सायंकाळी ५.३० ला आपल्या लहान बहिणीसोबत सोफ्यावर टीव्ही बघत बसली. तिची आई अन् आजी गच्चीवर धान्य साफ करीत होत्या. तेवढ्यात दातऱ्या घरी आला. त्याने मुलीचा हात हातात घेतला अन् ‘तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही’, अशी विचारणा केली. लहान बहीण बाजूला असताना दातऱ्याने विचारलेल्या प्रश्नाने ती गोंधळली. तिने हात झटकला अन् दातऱ्याला निघून जाण्यास सांगितले. दातऱ्याने तिचा पुन्हा हात पकडला अन् पिरगळला तसेच ‘तू माझ्यावर प्रेम करतेस की नाही’, अशी पुन्हा-पुन्हा विचारणा करू लागला. दातऱ्याच्या भाईगिरीमुळे मुलगी अन् तिची बहीण आरडाओरड करू लागली. ती ऐकून मुलीची आई अन् आजी धावत खाली आल्या. त्यांना पाहून दातऱ्या पळून गेला. या प्रकारामुळे मुलगी दहशतीत आली. वडील घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार कळला. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीसह कळमना ठाण्यात धाव घेतली. मान उंचावणारा प्रकार जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शहरातील सर्व पोलीस ठाण्याची धुरा मंगळवारी महिला अधिकाऱ्यांनी सांभाळली होती. पोलीस उपनिरीक्षक छाया गुजर यांच्याकडे हे प्रकरण येताच त्यांनी मुलीची तक्रार लिहून घेतली. लगेच पोलिसांचा ताफा आरोपीच्या शोधार्थ रवाना केला. त्याला तासाभरातच अटक करण्यात आली. बुधवारी त्याला कोर्टात हजर करायचे होते. ठाणेदार सुनील बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गुजर यांनी पुराव्यासह कागदपत्रे बनविली अन् घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात् २४ तासाच्या आतच दातऱ्याविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. हा प्रकार नागपूर शहर पोलिसांची मान उंचावणारा तसेच पोलिसांच्या आजवरच्या इतिहासात मैलाचा दगड ठरला आहे. (प्रतिनिधी)मर्दानी, गंगाजल इफेक्टमर्दानी, गंगाजल सारख्या चित्रपटातून महिला पोलीस अधिकाऱ्यांचा दबंगपणा बघायला मिळाला. या चित्रपटात दबंग भूमिका साकारणाऱ्या राणी मुखर्जी, प्रियंका चोप्राच्या अभिनयाचीही जोरदार प्रशंसा झाली. प्रत्यक्षात असा प्रकार कुठे बघायला मिळत नाही. मात्र, कळमन्यात महिला दिनाच्या औचित्याने का होईना एका मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण एवढ्या झटपट मार्गी लावून कळमना पोलिसांनी तपासाची वेळखाऊ प्रक्रिया बाद केली अन् सिनेमासारखी तत्परता वास्तवात आणली.