शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

‘जंक फूड’ वाढवतेय आजारांचे ‘गूढ’

By admin | Published: April 07, 2015 2:18 AM

नागपूरकरांमध्ये बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी लोक

३० टक्के नागपूरकर आजारांच्या विळख्यात : अ‍ॅबनॉर्मलिटी रिपोर्टमधील धक्कादायक तथ्य नागपूर : नागपूरकरांमध्ये बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी लोक रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात. परिणामी, हे लोक लठ्ठपणा या आजारापासून पीडित आहेत. त्यांच्यामध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. आयर्नच्या कमी सेवनासह अपुऱ्या आहारामुळे अ‍ॅनेमिया व जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रकरणे वाढली आहेत. एका सर्वेक्षणात २४ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व ब१२ ची कमतरता आढळून आली आहे. ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्यानिमित्ताने जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘शेतापासून ताटापर्यंत अन्नाची सुरक्षितता’ यावर भर दिला आहे. इंडस हेल्थ प्लस आणि वितरण भागीदार नागपूर स्कॅन सेंटरद्वारे जानेवारी २०१४ ते फेब्रुवारी २०१५ या दरम्यान ९३२१ पुरुष व ८३२६ स्त्रियांची तपासणी करून ‘अ‍ॅबनॉर्मलिटी रिपोर्ट-२०१५’ सादर केला. यात हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ३१.९ टक्के पुरुष मधुमेहीभारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रु ग्ण आढळतात आणि मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणांपैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरूपात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहेत. शहरात ३१.०९ टक्के पुरुष तर २६.२३ टक्के महिला या व्याधीने पीडित आहेत. २८ ते ३५ वर्षीय स्त्रियांमध्ये वाढतोय लठ्ठपणाशहरात लठ्ठपणाच्या केसेसमध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. तणाव, जंक व तेलकट फूडचे अधिक प्रमाणात सेवन यासोबतच आठवड्यामधून दोनदा किंवा तीनदा जेवणासाठी बाहेर जाणे अशा कारणांमुळे मुख्यत: २८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्रियांना लठ्ठपणाचा धोका असल्याचे आढळून आले आहे. जीवनसत्त्वाचे कमी सेवन व चरबीयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा खाण्याच्या सवयींमुळे २५ ते ३० टक्के युवा पिढींच्या जीवनात आजाराचा धोका वाढला आहे. २३ टक्के स्त्री-पुरुषांना डोळ््यांचा विकार लोहयुक्त आहाराच्या अभावामुळे २३.६९ टक्के पुरुष व २३.८८ टक्के स्त्रियांमध्ये डोळ्यांविषयक समस्या असल्याचे आढळून आले. वेळेचा अभाव, १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत लॅपटॉप्स व संगणकांचा वापर. रात्री दोन-तीन तास मोबाईलचा वापर यामुळे मुख्यत: २० ते २५ वर्षे वयोगटातील युवा पिढीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे आढळून आले. लोहयुक्त आहाराच्या कमी सेवनामुळे १९.३६ टक्के स्त्रिया अ‍ॅनेमियापासून पीडित आहेत. हृदयविकारात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिकआईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील २५.२१ टक्के पुरुष हृदयविकाराने पीडित आहेत. धक्कादायक म्हणजे, यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. २६.२६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत.