शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
5
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
6
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
7
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
8
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
9
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
12
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
13
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
14
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
15
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
16
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
17
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
18
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
19
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
20
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात

रणजित देशमुख यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट

By admin | Published: July 11, 2017 1:58 AM

धनादेश अनादर प्रकरणाच्या विशेष न्यायालयाने परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक माजी मंत्री रणजित देशमुख व अमित धुपे यांच्याविरुद्ध चार हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावला आहे.

विशेष न्यायालय : धनादेश अनादराचे प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धनादेश अनादर प्रकरणाच्या विशेष न्यायालयाने परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीचे संचालक माजी मंत्री रणजित देशमुख व अमित धुपे यांच्याविरुद्ध चार हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट बजावला आहे. त्यांना १९ जुलै रोजी व्यक्तिश: किंवा वकिलामार्फत न्यायालयात उपस्थित व्हायचे आहे.परसेप्ट वेब सोल्युशन कंपनीने तक्रारकर्ते अतुल देवगडे यांच्याकडून कॉम्प्युटर नेटवर्किंगच्या वस्तू खरेदी केल्या होत्या. त्या मोबदल्यात कंपनीने ११ लाख रुपयांचे सहा धनादेश दिले होते; त्यापैकी पाच धनादेशांचा अनादर झाला. देशमुख व धुपे यांच्यासह भाविन पारेख व पल्लवी पारेख हे कंपनीचे संचालक आहेत. देवगडे यांनी चारही संचालकांविरुद्ध विशेष न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. नोटीस मिळाल्यानंतर भाविन व पल्लवी पारेख न्यायालयात उपस्थित झाले. परंतु देशमुख व धुपे यांनी न्यायालयाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आला आहे. १९ जुलै रोजी व त्यानंतर पुढील निर्देशानुसार न्यायालयात उपस्थित होण्याची हमी दिल्यास त्यांना चार हजार रुपये भरल्यावर जामीन दिला जाईल. जामीनपात्र वॉरंटची दखल न घेतल्यास त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केला जाऊ शकतो. तक्रारकर्त्यातर्फे अ‍ॅड. इब्राहिम बख्श आझाद यांनी बाजू मांडली.