शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

जरा हटके! गणेशमूर्तीच्या विसर्जनानंतर तेथेच अंकुरेल रोपटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 12:08 PM

लाल माती, सेंद्रिय खत, नैसर्गिक रंग व बियांचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे.

ठळक मुद्देलाल माती, सेंद्रिय खत, बियांपासून निर्मिती

अंकिता देशकर।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सवामुळे पर्यावरणाचे नुकसान होऊ नये यासाठी मुंबई येथील मूर्तिकार दत्ताद्री कोथूर यांनी अनोखा उपाय शोधून काढला आहे. लाल माती, सेंद्रिय खत, नैसर्गिक रंग व बियांचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार करण्याचा हा उपाय असून ही मूर्ती विसर्जित केल्यानंतर तेथेच रोपटे अंकुरेल व पर्यावरणाचे रक्षण होण्यास हातभार लागेल. या मूर्तीला ‘ट्री गणेशा’ हे नाव देण्यात आले आहे. नागरिकांनी ‘ट्री गणेशा’ला स्वीकारल्यास पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मोठे बळ मिळू शकते.सुरुवातीला गणेशमूर्ती तयार करण्यासाठी माती वापरली जात होती. मातीच्या मूर्तींमुळे पर्यावरण, जलस्रोत व जलचर प्राण्यांना कोणताही धोका पोहचत नव्हता. काळाच्या ओघात गणेशमूर्ती तयार करण्यासाठी पीओपीचा उपयोग व्हायला लागला. पीओपीची गणेशमूर्ती दिसायला आकर्षक असते. त्यामुळे तिचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला. पीओपी सहज नष्ट होत नाही.परिणामी, त्याचा पर्यावरण, जलस्रोत व जलचर प्राण्यांवर अतिशय गंभीर परिणाम होतो. हे चित्र बदलण्यासाठी ‘ट्री गणेशा’ प्रभावी उपाय ठरू शकतो.कोथूर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर त्यांनी यासंदर्भात विस्ताराने माहिती दिली. पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. त्यामुळे गणेशोत्सव नैसर्गिक पद्धतीने साजरा व्हावा, असे नेहमी वाटत होते. त्यातून ‘ट्री गणेशा’चा विचार मनात आला. त्याला हळूहळू प्रतिसाद मिळत आहे. गेल्यावर्षी नागपुरातून अनेकांनी ‘ट्री गणेशा’ची मागणी केली होती. परंतु, समन्वयक नसल्यामुळे ‘ट्री गणेशा’ नागपूरपर्यंत पोहचवता आला नाही. यावर्षी नमन बेठारिया यांनी ही जबाबदारी घेतली असून, ते नागपुरात ‘ट्री गणेशा’चा प्रचार करीत आहेत, असे कोथूर यांनी सांगितले.त्यांनी ‘ट्री गणेशा’ तयार करण्याची पद्धतही सांगितली. ‘ट्री गणेशा’ तयार करण्यासाठी गुजरातमधील लाल माती वापरली जाते. एक मूर्ती तयार करण्यासाठी संपूर्ण दिवस लागतो तर, ती मूर्ती वाळण्यासाठी १० दिवस लागतात. मूर्ती तयार करताना मातीत विविध झाडांच्या ७-८ बिया टाकल्या जातात. याशिवाय अन्य वस्तूही नैसर्गिक असतात, अशी माहिती त्यांनी दिली. बेठारिया यांनी नागपूरमध्ये ‘ट्री गणेशा’ला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सव