शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जरा हटके! लाख मोलाचा आफ्रिकन ब्रेवो मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 8:08 PM

२४ तासांपूर्वी उडून गेलेला आफ्रिकन पोपट मानकापूर पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच शोधून काढला.

ठळक मुद्देपोलिसांनी शोधून काढला२४ तास भटकला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माणसाच्या ताब्यातून मोठमोठ्या चिजवस्तू सटकल्या की त्या परत मिळणे अवघडच ! चिजवस्तू काय, महिला-पुरुष, मुले, मुली एकदा बेपत्ता झाल्या की त्यांना शोधून काढणे पोलिसांसाठी कठीण काम ठरते. तेथे एखादा पाळीव पक्षी आकाशात उडून गेला तर त्याला पोलीस कसे शोधून काढणार ? मात्र, म्हणतात की पोलिसांनी मनावर घेतले तर काहीही शक्य होते. अन् ते बुधवारी पुन्हा एकदा खरे ठरले. २४ तासांपूर्वी उडून गेलेला आफ्रिकन पोपट मानकापूर पोलिसांनी तक्रार मिळाल्यानंतर काही तासांतच शोधून काढला.विनोदकुमार माहोरे हे महावीरनगर झिंगाबाई टाकळी परिसरात राहतात. ते वेकोलित व्यवस्थापक आहे. त्यांच्याकडे एक आफ्रिकन पोपट आहे. हा पोपट म्हणजे माहोरे परिवारातील एक सदस्यच. राखडी रंगाचा अन् लाल शेपटीच्या या पोपटावर माहोरे कुटुंबीयांचा चांगलाच जीव आहे. प्रेमाने ते पोपटाला ब्रेवो म्हणतात. ब्रेवोही तसा आज्ञाधारीच. माहोरे कुटुंबीयांतील सदस्याची प्रत्येक गोष्ट तो निमूटपणे ऐकतो अन् त्यांनी सांगितल्याप्रमाणे बोलतो, करतोही. मात्र, मंगळवारी काय झाले कळायला मार्ग नाही. रात्री ७.३० च्या सुमारास ब्रेवोने माहोरेंच्या घरातून आकाशात भरारी घेतली. तो निघून गेल्याने अवघे माहोरे कुटुंबीय अस्वस्थ झाले. कावरेबावरे होऊन त्याची वाट बघू लागले. रात्रीची वेळ असल्याने त्याला शोधणे शक्य नव्हते. त्यामुळे तो परत येईल, या आशेवर माहोरे कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली. मात्र, ब्रेवो परतला नाही. बुधवारी सकाळपासून माहोरे कुटुंबीयांनी ब्रेवोचा परिसरातील झाडांवर शोध घेतला. मात्र, तो आढळला नाही. त्यामुळे अखेर विनोदकुमार माहोरे यांनी मानकापूर ठाण्यात ब्रेवो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. तक्रार नोंदविताना ब्रेवो मिळेल, अशी त्यांना खात्री नव्हती मात्र ब्रेवोच्या मायेने वेडे झालेल्या स्वत:च्या मनाची तसेच कुटुंबीयांची समजूत काढण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले. सुमारे एक लाख रुपये किंमत असलेल्या ब्रेवोच्या बेपत्ता होण्याची ठाणेदार वजिर शेख यांनी ‘मिसिंग’ दाखल करून घेतली. सर्व कर्मचाऱ्यांना त्यांनी पोपटाला शोधून काढण्याच्या सूचना केल्या. बुधवारी दुपारी शांतता समितीची पोलिसांनी बैठक घेतली. त्यातही बेपत्ता ब्रेवोची चर्चा झाली. त्यानंतर सोशल मीडियावर ब्रेवो व्हायरल झाला अन् ब्रेवोच्या शोधकार्यात नागरिकांचीही जोड मिळाली.हाक देताच ब्रेवोने साद दिलीएका मुलाने पोलिसांना सायंकाळी फोन करून आमच्या अपार्टमेंटमध्ये एक ग्रे कलरचा पोपट असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी माहोरेसह त्या ठिकाणी धाव घेतली. २४ तासांपासून घरापासून दुरावलेला आणि अन्नपाण्याविना भटकणारा ब्रेवोही अस्वस्थ झाला. माहोरेने त्याला हाक देताच ब्रेवोनेही साद दिली. ये म्हणताच त्यांच्या खांद्यावर आला अन् मुलाने पित्याच्या कवेत जावे तसे त्यांच्या दोन्ही हातात आला. बराच वेळेपर्यंत ब्रेवो अन् माहोरेचा संवाद चालला अन् अखेर ते पोलीस ठाण्यात पोहचले.पोलीस ठाण्यात ब्रेवोगिरीमाहोरेच्या हातात अर्थात कुटुंबीयात पोहचल्यामुळे ब्रेवोचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. मानकापूर ठाण्यात त्याने तो वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला. ठाणेदार शेख यांच्यासह अनेकांशी गप्पा मारल्या. त्यांना धन्यवाद दिले. त्यांनी जवळ येऊन बसायला सांगताच पोलीस अधिकाºयाच्या खांद्यावर बसून ब्रेवोने ऐटीत फोटोही काढून घेतले.

 

 

टॅग्स :SocialसामाजिकPoliceपोलिस