लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: तंत्रज्ञानाने केलेली अलीकडची प्रगती म्हणजे अलेक्सा. अलेक्साची व्याख्या सांगायची झाली तर ती, मौखिक आज्ञा स्वीकारणारे तंत्रशुद्ध यंत्र, अशी करता येईल. अलेक्सा हा शब्द अलेक्झांडरचा स्त्रीलिंगी अवतार आहे. ग्रीक भाषेत अलेक्साचा अर्थ सुंदर स्त्री असा होतो. या अलेक्साला कालपरवापासून ट्विटरवासियांनी काही मजेशीर कामं सांगायला सुरुवात केली आहे.. त्याची एक झलक..अलेक्सा तीन शिट्ट्या झाल्या की कुकर बंद कर..अलेक्सा, वर्गणी मागायला कुणी आलं तर, घरी कुणी नाहीये असं सांग..पुणेरी अलेक्सा- १ ते ४ दरम्यान कुठलीही आॅर्डर स्वीकारली जाणार नाही...अलेक्सा. दूध उतू जाईल बघ..अलेक्सा- गुगल असिस्टंटला सकाळचा ७ चा अलार्म लावायला सांग..अलेक्सा, म्होर हो, चा अनुवाद सांग बरं..अलेक्सा, १५ लाख या जन्मी मिळतील का गं..अलेक्सा... ऐ, अलेक्सा..अलेक्सा- अं... मी नाही येत जा...ट्विटरवासियांनी अलेक्साला आधीच्या रामागडीचा किंवा रामूकाकाचा आधुनिक अवतार बनवले असे म्हणता येईल.
जरा हटके! अलेक्साला मिळणाऱ्या काही मजेशीर आज्ञा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:32 PM