शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

नुसताच हाय अलर्ट, सुरक्षा कुचकामी

By admin | Published: January 04, 2016 4:53 AM

रेल्वेस्थानक देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. रेल्वेस्थानकावर दररोज ११० ते

रेल्वे प्रशासनाकडून कमालीचे दुर्लक्ष : खुष्कीचे मार्ग ठरताहेत धोकादायक दयानंद पाईकराव ल्ल नागपूरनागपूर रेल्वेस्थानक देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. रेल्वेस्थानकावर दररोज ११० ते १२५ रेल्वेगाड्या आणि जवळपास ४० ते ५० हजार प्रवासी ये-जा करतात. असे असताना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे कुठलीच खबरदारी घेण्यात येत नसल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी पंजाबमधील पठाणकोट एअरबेसवर आतंकवाद्यांनी हल्ला चढविला. त्यानंतर नागपूर रेल्वेस्थानकावर हायअलर्ट जारी करण्यात आला. परंतु ‘हाय अलर्ट’ जारी केल्याच्या तिसऱ्याच दिवशी रेल्वेस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला असता खुष्कीच्या मार्गांमुळे सुरक्षा व्यवस्था कमकुवत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवली.रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर पश्चिमेकडील भागात दोन शस्त्रधारी जवान तैनात करण्यात आले आहे. संशयास्पद व्यक्तींची तपासणी होत आहे. प्रत्येकाचे सामान बॅग स्कॅनरमध्ये तपासण्यात येत आहे. परंतु एकाच ठिकाणी हा देखावा करून रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा समाधान मानत आहे. प्रत्यक्षात रेल्वेस्थानकाच्या परिसरात शिरण्यासाठी कित्येक पळवाटा शिल्लक आहेत. तेथून असामाजिक तत्त्व थेट रेल्वेस्थानकात शिरून घातपात घडवू शकतात. परंतु या बाबीकडे रेल्वे प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेचे दुर्लक्ष होत असून प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ‘बीडीडीएस’ पथकही थांबते मोजकाच वेळरेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांचे ‘बीडीडीएस’ पथक येऊन तपासणी करते. परंतु या पथकातील अधिकारी, कर्मचारी काही वेळ रेल्वेस्थानकावर फेरफटका मारतात आणि त्यानंतर निघून जातात. ८ प्लॅटफार्म आणि हजारो प्रवासी असलेल्या रेल्वेस्थानकाची तपासणी केवळ एक ते सव्वा तासात थातुरमातूरपणे पूर्ण करण्यात येते. हाय अलर्टच्या दुसऱ्याच दिवशी या पथकाची गाडी केवळ १.४५ तास थांबून निघून गेल्याचे दिसले.लोहापुलाजवळून गाड्यात बसतात प्रवासीलोहापुलाजवळ रेल्वेगाड्यांचा वेग मंदावतो. त्यामुळे लोहापुलाच्या शेजारून असलेल्या वाटेने प्रवासी वर चढून रेल्वे रुळाच्या बाजूला गाडीची वाट पाहतात. गाडी आली की ते गाडीत चढतात. तसेच असंख्य प्रवासी येथेच गाडीतून खाली उतरून बाजूच्या मानस चौकातून आॅटो पकडून निघून जातात. येथे सुद्धा या प्रवाशांना अडविण्याची कुठलीच व्यवस्था नसल्याचे दिसले.एसी वेटींग हॉलसमोरील रस्ता खुला‘आरपीएफ’ ठाण्याच्या बाजूने असलेल्या एसी वेटींग हॉलच्या समोरून असलेला रस्ताही असामाजिक तत्त्वांसाठी अगदी खुला आहे. आधीच रेल्वेस्थानकावर खुष्कीचे मार्ग कमी होते की काय म्हणून रेल्वे प्रशासनाने यात आणखी एका रस्त्याची भर घालून हा रस्ता खुला करून दिला आहे.पार्सल कार्यालयातूनही आत येतात प्रवासीपूर्वेकडील पार्सल कार्यालयातूनही प्रवासी रेल्वेस्थानकाच्या आत येत असल्याचे चित्र आढळले. पार्सल कार्यालयाच्या परिसरात कुठलीच सुरक्षा यंत्रणा नसते. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी आत प्रवेश करताना दिसले. काही जण तर दुचाकीवर स्वार होऊन पार्सल कार्यालयाच्या बाजूने आत घुसले आणि पश्चिमेकडील भागातून बाहेर पडल्याचे धक्कादायक चित्र दृष्टीस पडले.पॅसेंजर लाऊंजशेजारील रस्ता धोक्याचारेल्वे सुरक्षा दलाच्या शेजारी नव्यानेच तयार करण्यात आलेल्या पॅसेंजर लाऊंजच्या बाजूने थेट प्लॅटफार्म क्रमांक एकवर जाता येते. अलीकडच्या काळात तर दुचाकीही येथे उभ्या करण्यात येत असल्याचे दिसते. या रस्त्याने आत गेल्यास कुठलीच बॅग तपासण्याची गरज नाही आणि कुणीच अडविण्याची शक्यता उरत नाही.२५०० कोटी उत्पन्न, सुरक्षा भिंतीसाठी पैसा नाहीमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला दरवर्षी विविध मार्गाने २५०० कोटी रुपये उत्पन्न मिळते. परंतु या उत्पन्नातील एकही रुपया सुरक्षेच्या दृष्टीने खर्च होताना दिसत नाही. रेल्वेस्थानकाच्या आत शिरण्यासाठी असलेल्या असंख्य वाटा बंद करण्याच्या दृष्टीने येथे सुरक्षा भिंत उभारणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु या गंभीर बाबीकडे रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.क्राईम ब्रँच शेजारीच अवैध गेटरेल्वे सुरक्षा दलाच्या क्राईम ब्रँचच्या शेजारीच प्रवाशांना आत शिरण्यासाठी अवैध गेट आहे. येथून दिवसाकाठी असंख्य प्रवासी आपल्या सामानाची कुठलीच तपासणी न करता आत शिरतात. अनेक वर्षांपासून हा प्रकार सातत्याने सुरू आहे. परंतु हे गेट बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आणि सुरक्षा यंत्रणेने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचे दिसते.विमानतळावर कडेकोट बंदोबस्त, वॉच टॉवरवरून निरीक्षण४पठाणकोट येथील आतंकवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापूर्वी विमानतळाची सुरक्षा भिंत पार करून काही संशयित व्यक्तींनी आत प्रवेश केला होता. परंतु सुरक्षा व्यवस्थेच्या वेळीच लक्षात आल्यामुळे त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी विमानतळाच्या चारही भागात असलेल्या उंच वॉच टॉवरवरून संपूर्ण परिसरात लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय विमान उतरत असलेल्या आॅपरेशनल एरियात पेट्रोलिंग वाढविण्यात आले आहे. टर्मिनल बिल्डींगसमोर बंदुकधारी सीआरपीएफ जवानांना तैनात करण्यात आले आहे. विमानतळाच्या पार्किंग परिसरातही ये-जा करणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. विमानतळात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तपासणी करण्यात येत आहे. टर्मिनल बिल्डींगमधून विमानाकडे जाणाऱ्या प्रवाशांना विमानात बसण्यापूर्वी पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यात येत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलीच ‘रिस्क’ घेण्यात येत नसल्याची माहिती विमानतळावरील सूत्रांनी दिली.प्रत्येक ठिकाणी जवान नेमणे अशक्य‘रेल्वेस्थानकावर असलेले अनधिकृत रस्ते कमी करण्यासाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली एका समितीचे गठन करण्यात आले आहे. रेल्वेस्थानकावर सुरक्षा भिंत बांधण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. रेल्वेस्थानकाच्या आत येण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणी ‘आरपीएफ’ जवान तैनात करणे शक्य नाही.’ज्योती कुमार सतीजा वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, ‘आरपीएफ’पंजाबातील पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षेत अभूतपूर्व वाढ करण्यात आली आहे. रविवारी नागपुरातील रेल्वे स्थानकावरही याचा प्रत्यय आला. सुरक्षा दलांनी श्वासपथकासह स्थानकाचा ताबा घेतला. मात्र, इतरत्र असलेली सुरक्षा प्रभावी नव्हती.